Saturday, 24 Jul, 12.40 pm नाशिक LIVE

होम
इगतपुरीची तहान भागविणारे भावली धरण भरण्याच्या मार्गावर

नाशिक लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहराची तहान भागविणाऱ्या भावली धरण भरण्याच्या मार्गावर आहे. तरी देखील इगतपुरी शहरात पाणीचिंता सुरू झाली आहे.

पाणीकपात करण्यासाठी तत्परता दाखविणारे प्रशासन पाण्याच्या नियोजनाबाबत मात्र तत्पर नसल्याची खंतही यावेळी नागरिकांकडून व्यक्त केली जाात आहे. भावली धरण सततच्या पावसामुळं भरण्याच्या मार्गावर असून पाणीकपात कधी रद्द होणार याकडे इगतपुरीकरांचं लक्ष लागंल आहे.

मागील काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. इगतपुरी मध्ये देखील पावसाची सततधार सुरु आहे. यामुळे शहराची तहान भागविणाऱ्या भावली धरण भरण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, 2017 ला 2 वर्षात भावली धरणाचे पाणी इगतपुरी शहराला 24 तास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आलं. मात्र, प्रत्यक्षात 3 वर्षाहून जास्त कालावधी उलटून गेला तरीही अद्याप शहरात पाईप लाईनचे काम झालेले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच डिसेंबर ते मार्च आठवड्यात तीन दिवस पाणी व नंतर एप्रिल ते जुलैपर्यंत आठवड्यातून दोन दिवस पाणी शहरातील नागरिकांना दिले जात आहे. त्यातही पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो.

दिवसाला 45 मिनिटेही पाणी पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील स्थानिकांना पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.तर सदर खणलेले खड्डे लवकर मुजवण्यात येणार असून लवकरच इगतपुरी शहराची पाणी कपात ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होणार असल्याचे प्रशासनानं सांगितलंय. भावली पाणी योजना डिसेंम्बर अखेर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यानी सांगितले. गेल्या 24 तासात तालुक्यात 55 मिलीमीमीटर पावसाची नोंद झाली असून आता पर्यंत 1623 मिली पाऊस पडला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nashik Live
Top