Friday, 23 Jul, 8.34 am नाशिक LIVE

होम
कोरोना नियमांचे उल्लंघन ; नाशकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

नाशिक लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये निर्बंध लावण्यात आली आहे. निर्बंधांमुळे शहर-जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध आहे. असे असतानाही नाशिकमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

शिवसेनेने नियम मोडून मेळावा, बैठक घेतल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात, तर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नियमांकडे दुर्लक्ष करून सामुदायिक नमाजपठण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील राधाकृष्ण लॉन्समध्ये शिवसेनेचा मेळावा, बैठक घेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यात उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी, मल्हारी मते, वैभव ठाकरे, शोभा मगर, महेश मते, संजय शिंदे, संदीप मते यांचा समावेश आहे.

बकरी ईदनिमित्त बुधवारी मशिदींमध्ये सामुदायिक नमाजपठण केल्याबद्दल भद्रकालीत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. कथडा मशीद येथे बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश डावलून सुमारे १४० जणांच्या गर्दीला नमाजपठणासाठी प्रवेश देण्यात आला. या प्रकरणी हवालदार जयप्रकाश शिरोळे यांच्या तक्रारीवरून अब्दुल शाकूर सय्यद, (कथडा मशीद), नासिर खान रज्जाक खान पठाण, कुतुबुद्दिन दिलावर मुल्ला (रा. सादिकरनगर) यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या प्रकारात दूध बाजारातील शाही मशिदीत जमावबंदी आदेश डावलून नमाजपठाणाला गर्दी जमविल्याने गयाउद्दिन अब्दुल कादीर यांच्यासह ट्रस्टींवर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nashik Live
Top