Friday, 23 Jul, 8.19 am नाशिक LIVE

होम
पावसामुळे रस्ते खड्ड्यात; मुुरुम टाकून मलमपट्टी

नाशिक लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करूनही शहरात खड्डे मात्र कायम आहेत. तसेच, अनेक ठिकाणी खड्ड्यांवर केवळ थोडाफार मुरुम टाकून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे करता येत नाहीत. यामुळे पावसाळ्यानंतर शहरासह परिसरातील सर्व खड्डे बुजविले जाणार असे अाश्वासन महापालिका प्रशासनाकडून दिले जात असले तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांतील रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

मागील काही दिवसांपासून थांबलेल्या पावसानंतरही वाहनधारकांची खड्ड्यांतून मुक्तता झालेली दिसून येत नाही. प्रशासनाचा निषेध म्हणून शहरातील सामाजिक संस्था आणि काही राजकीय पक्षांनी खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड केली होती. मात्र, त्याचाही प्रशासनावर काहीही परिणाम होताना दिसत नाही. वडाळारोडवरील खड्डे बुजविले जात असताना त्याचजवळ असलेल्या खोडेनगर, विनयनगर, जयहिंद कॉलनी व पखालरोड भागातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nashik Live
Top