Saturday, 24 Aug, 1.30 am Natural Beauty Secrets

Home
३ भारतीय महिलांनी शेअर केले उत्तम त्वचेचे रहस्य

आपल्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपण त्वचेची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यापैकी काही जणींना त्वचेबाबत थोडेफार दुर्लक्ष केले तरी चालून जाते, पण काहींना मात्र असे करून अजिबात चालत नाही.

तुम्ही विचाराल अशा कोण असतात? ज्या नियमितपणे बाहेरच्या वातावरणात असतात किंवा प्रदूषणात वावरतात त्यांच्या त्वचेवर या वातावरणाचा अधिक परिणाम होतो. त्यांच्यासाठी त्वचा चांगली ठेवण्याचा एकच मार्ग असतो. तो म्हणजे त्वचेची योग्य काळजी घेणे.

सादर करत आहोत तरूण त्वचेचे रहस्य

त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. आपण कोणत्याही प्रकारचे काम करत असलो तरी फार काळ ऊन टाळू शकत नाही. याचे सुरुवातीला काही परिणाम दिसत नसले तरी यामुळे काही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. आम्ही अशा काही प्रोफेशनल्सशी बोललो ज्या नेहमी प्रवासात असतात आणि त्यांच्याकडे तुमच्यासाठी उत्तम (आणि व्यावहारिक!) सल्ला आहे! त्या काय म्हणत आहेत ते आपण जाणून घेऊ या.

  • इट्स अ रॅप!

नाव: जसवीन कौर

वय: २५ वर्षे

काम: साहाय्यक दिग्दर्शक

त्वचेची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यावी, असे आम्ही जसवीन कौरला विचारले. तिच्या कामाचे स्वरुप पाहता मानसिक ताण हा तिच्या त्वचेचा मुख्य शत्रू आहे. तिच्या त्वचेच्या कोणत्याही समस्यांसाठी ती अॅलो व्हेरा जेल आणि पाण्याच्या मिश्रणाचा रोज क्लिन्सर म्हणून वापर करते. त्याचप्रमाणे घराबाहेर पडण्याच्या १५-२० मिनिटे आधी ती सनस्क्रीन लावते.

स्कीनकेअर उत्पादनांची निवड करण्याबाबत ती म्हणते, "मी पारंपरिक घटकांना प्राधान्य देते कारण ते तुलनेने सुरक्षित असतात आणि नैसर्गिकपणे तुमच्या त्वचेची काळजी घेतात. कृत्रिम घटक असलेली उत्पादने दीर्घकाळ वापरली तर अॅलर्जी होऊ शकते किंवा त्वचेची काळजी घेण्याऐवजी त्वचेला अपाय होऊ शकतो. नैसर्गिक घटक असलेल्या उत्पादनांच्या बाबतीत हे संभवत नाही.

  • हा सल्ला बँकेतील ठेवींइतकाच उपयोगी ठरेल.

तुम्हाला वाटेल की बँकेची नोकरी असेल तर तुम्ही चार भिंतींच्या आता रहू शकता आणि तुमच्यावर बाहेरच्या वातावरणाचा काही परिणाम होणार नाही. पण परिस्थिती नेहमीच अशी नसते!

आपण भेटणार आहोत एका बँकरला ज्या तुम्हाला गुजगोष्टी सांगत आहेत.

नाव: वैशाली शेठ

वय: ३७ वर्षे

कामाचे स्वरुप: खासगी बँकिंग प्रोफेशनल

त्या मान्य करतात की त्यांच्या बँकिंग आणि फायनान्स व्यवहारांमध्ये त्यांना अग्रेसर राहावे लागतेच, त्याचप्रमाणे त्यांच्या त्वचेची काळजी घेण्याबाबतही त्यांना अत्यंत दक्ष राहावे लागते.

त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना शहरातील विविध भागांमध्ये आपल्या क्लाएंट्सना भेटण्यासाठी जावे लागते. शेठ म्हणतात की, त्वचेचे आरोग्य सांभाळणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक असते. त्या म्हणतात, "माझ्या त्वचेला धुळीचा आणि उन्हाचा सामना करावा लागतो आणि त्वचेची काळजी घेणे कठीण होऊन बसते. म्हणून मी दिवसाला किमान दहा ग्लास पाणी पिऊन माझी त्वचा ओलसर ठेवण्याचा प्रयत्न करते, दोन मीटिंग्जच्या मधील वेळात मी माझ्या चेहऱ्यावर आणि मानेवर पाणी मारते आणि हर्बल क्लिन्सर वापरते."

  • मौल्यवान सेल्स प्रस्ताव

विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींकडून उत्तम सल्ला मिळू शकतो. आता आपण एका अशा व्यक्तीशी बोलणार आहोत ज्यांचा बहुतांश वेळ बाहेर जातो.

नाव: अंकिता उपाध्याय

वय: ३२ वर्षे

काम: सेल्स एक्झिक्युटिव्ह

उपाध्याय या पूर्ण वेळ एक्झिक्युटिव्ह आहेत आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगचा त्यांना छंद आहे. आठवड्यातील कामाच्या दिवसांमध्ये त्या बाहेरच असतात आणि वीकएंडला त्या कॅम्पिंग आणि ट्रेकिंगसाठी जातात. जेव्हा त्या दुर्गम भागात जातात तेव्हा अंघोळ करताना किंवा हातपाय धुताना त्या कडुलिंबाच्या पानांचा वापर करतात. कारण ही पाने सहज उपलब्ध असतात आणि ते निश्चितपणे निर्जंतुकीकरण करतात. त्वचेची काळजी घेण्याच्या त्यांच्या पद्धतीवषियी त्या म्हणाल्या, "मी फार काही करत नाही, पण मी सनस्क्रीन नेहमी लावते. मी मेकअप ठेवून कधीही झोपत नाही आणि झोपण्याआधी नेहमी माझा चेहरा गार पाण्याने धुते. मी बाहेर जाणार असेन तर नैसर्गिक घटक आणि कडुलिंबाचा किंवा लिंबाचा रस असलेली उत्पादने घेते." हा सल्ला नक्कीच उपयोगी पडेल. उपाध्याय पुढे म्हणाल्या, "हा पर्याय नेहमी सुरक्षित असतो. या उत्पादनांनी तुम्हाला परफेक्ट लुक मिळाला नाही तरी त्याचा दुष्परिणाम होणार नाही याची तुम्हाला खात्री असते, जे मला वाटते अधिक महत्त्वाचे आहे." उपाध्याय यांच्यासाठी विश्वासार्हता हा मूलमंत्र आहे.

त्वचेची काळजी घेण्याची योग्य पद्धत

घटकांची काळजीपूर्वक निवड करणे हा मूलभूत नियम या सर्व जणी पाळतात. आपली त्वचा उजळ करण्यासाठी आणि ओलसर ठेवण्यासाठी कौर यांचा अॅलो व्हेरावर विश्वास आहे तर उपाध्याय यांचा विश्वास कडुलिंबावर आहे जेणेकरून त्या कधीही कुठेही #GoOutsideSafe शकतात.

तुमच्यासाठी योग्य असलेल्या नैसर्गिक घटकाची निवड करणे हा नियम अनुसरावा.

या महिलांकडून टिप्स घ्या आणि तुमच्या रोजच्या दगदगीमध्ये त्वचेच्या काळजीच्या ताणाची भर देऊ नका. नैसर्गिक घटक, बजेट, वापरण्यास सुलभ आणि तुम्हाला आवडेल असे सर्व निकष पूर्ण करणारे उत्पादन शोधा.

उदा. कडुलिंब हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या बजेटमध्ये कडुलिंब फिट बसते. १००% शुद्ध कडुलिंबाच्या तेलाची किंमत आणि त्याचा वापर हे गणित तुमच्यासाठी जुळत नसेल तर हमामची निवड करा. यात १००% शुद्ध कडुलिंबाचे तेल, तुळस, अॅलो व्हेरा हे घटक असतात. हे घटक त्वचेवरील पुरळ, पिंपल्स, दुर्गंधी इत्यादी १० प्रमुख त्वचाविकारांपासून संरक्षण करतात. आता त्वचेची काळजी न घेण्यासाठी कोणतेही कारण देऊन चालणार नाही!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top