Tuesday, 02 Apr, 2.32 am Natural Beauty Secrets

Home
३ व्यक्तींनी सांगितल्या केसगळती आणि 'केसवापसी'च्या कथा!

सरासरी प्रत्येक माणसाचे दिवसाला ८०-१०० केस गळतात. त्यांच्या केसांच्या वाढीच्या साखळीमध्ये नवे केस विकसित होण्यासाठी जुने केस पडणे आवश्यक असते. तुमचे केस आणि त्वचा यांच्या स्थितीवरून तुमच्या शरीरातील सर्वांगीण आरोग्याचा अंदाज येऊ शकतो. संशोधनानुसार दर तीन महिलांपैकी एका महिलेला तिच्या आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर केसगळतीचा सामना करावा लागतो.

अंतर्गत समस्यांप्रमाणेच हीट स्टायलिंग साधने, प्रदूषण, केसांना केलेले रंगलेपन, केसांसाठी असलेली उत्पादने, उष्णता आणि केसांचे दैनंदिन तुटणे हे सर्व घटक केसांसाठी हानिकारक असतात. जसजसे आपले वय वाढत जाते तसतसा केसांची निर्मिती आणि दुरुस्तीचा वेग कमी होतो. केसांचा संबंध सौंदर्याशी असला तरी केसगळती आणि टक्कल पडणे याचा तीव्र मानसिक परिणाम होतो आणि भावनिक गुंतागुंतही निर्माण होते.

आम्ही तीन महिला लाईफस्टाईल ब्लॉगर्सशी बोललो. भारतीय महिलांचे अंतरंग त्या आपल्या लेखणीतून मांडतात. या ठिकाणी त्यांनी आपले केसगळतीचे आणि सुरक्षित आणि परिणामपकार उपाय करून त्यांनी आपल्या केसांचे हे गतवैभव परत कसे मिळवले याचे अनुभव शेअर केले आहेत.

नयनतारा (https://www.instagram.com/mommyingbabyt/) ही एक नवमाता आणि एकूणच सुपरवूमन आहे. ती आपला ब्लॉग यशस्वीपणे चालवत आहे. ती पूर्णवेळ नोकरी करते आणि तिला एक लहान बाळ आहे. गरोदरपणात आणि प्रसूतीपश्चात झालेल्या केसगळतीबद्दल तिने आपले अनुभव लिहिले आहेत. हॉर्मोन्स, शरीरावर येणारा ताण, थकवा किंवा गर्भावस्थेदरम्यान होणारे इतर विकार यामुळे केसगळती होऊ शकते. जीवनसत्वे किंवा क्षारांच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती ओढवू शकते. नयनतारा म्हणतात की गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर असे काही होणे अगदी सामान्य आहे आणि नवमातांनी हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. त्यांनी आपला आहार पौष्टिक करून ही परिस्थिती हाताळली. केसांची निगा राखण्यात केलेल्या बदलांमुळेही मदत होते. तेल लावल्यामुळे नवीन केस येताना स्काल्पची निगा राखली जाते. भृंग, कडुनिंब आणि कोरफड यांचा समावेश असलेल्या इंदूलेखा तेलासारख्या उत्पादनाची निवड करा. या तेलातील सर्व घटक नव्या केसांच्या वाढीस चालना देणारे आहेत.

मोडानिंजाच्या पल्लवी सिंग

(https://www.instagram.com/modaninja/)

म्हणतात, काही रासायनिक ट्रीटमेंटनंतर त्यांनी केसगळती अनुभवली होती. तीव्र रसायनांचा वापर करून तुमच्या स्काल्पवर केलेल्या कोणत्याही ट्रीटमेंटमुळे केसांना अपाय होऊ शकतो. त्यांनी काही काळ रासायनांचा वापर केलेल ट्रीटमेंट थांबवली आणि घरगुती हेअर मास्कचा वापर करून ही परिस्थिती हाताळली. त्या सांगतात की केळे कुस्करून त्यात अंडे घालावे आणि हे मिश्रण केसांना लावावे आणि ३० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवून टाकावेत.

अयाना धिल्लन

(https://www.instagram.com/aianajsays/)

यांनीत्यांचा केसगळतीचा अनुभव सांगितला. त्यांना ऋतू बदलल्यामुळे केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्यांनी ओमेगा-३ सप्लिमेंट्स घेतल्या. त्याचा त्यांना फायदा झाला. त्या आपल्या केसांना नियमितपणे तेल लावतात. अयाना सांगतात की त्यांना अनुवांशिकतेने दाट केस लाभले आहेत पण त्यांना सुदृढ ठेवण्यासाठी त्यांनाही केसांना नियमितपणे तेल लावावे लागते.

या तीनही महिला केसांना नियमित तेल लावण्याच्या सवयीला महत्त्व देतात आणि नैसर्गिक घटकांचा समावेश असलेल्या केसगळतीवरील उपाययोजनांचा वापर करण्यावर त्यांचा भर असतो.

केसगळतीची कारणे अनेक असू शकतात. काही वेळा निश्चित कारण समजणे कठीण असते. असे असले तरी जीवनशैली, आहार आणि केसांची काळजी घेण्याच्या पद्धतींमध्ये बदल करून निश्चितच दीर्घकालीन लाभ होतो. आणि नैसर्गिक घटक समाविष्ट असलेली उत्पादने वापरली तर केसांच्य वाढीला चालना मिळते.

संयम, जीवनशैलीतील बदल आणि केसांची थोडीशी काळजी घेतली तर केस पातळ होणे आणि केसगळती यासारख्या समस्या भेडसावणार नाहीत. एवढे करूनही सहा-नऊ महिन्यांत तुमचे केस पूर्ववत झाले नाहीत तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top