Saturday, 24 Aug, 1.29 am Natural Beauty Secrets

Home
अॅडल्ट अॅक्ने: ही माहिती तुम्हाला असावी

थोडेसे तेल देखील तुमच्या त्वचेवर दीर्घकालीन परिणाम करू शकते. अॅडल्ट अॅक्नेमुळे तुम्ही त्रस्त असाल तर त्याची कारणे आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवावे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

EnglishTranslation

Types of Acne

 • Blackheads
 • Whiteheads
 • Papule
 • Pustule
 • Cystic
 • Nodule

अॅक्नेचे प्रकार

 • ब्लॅकहेड्स
 • व्हाइटहेड्स
 • पिटिका
 • पुटकुळी
 • पुळी
 • गाठ

अॅडल्ट अॅक्ने हा काही नवीन प्रकार आहे का? अजिबात नाही. किंबहुना जगभरात सर्रास आढळणारा हा त्वचाविकार आहे. अॅडल्ट अॅक्ने हा वेदनादायी असतो आणि तुमच्या किशोर वयात किंवा तरुणपणी येणाऱ्या अॅक्नेच्या तुलनेने हा अधिक खोलवर असतो. अॅडल्ट अॅक्नेसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. तेल साचत जाणे हा त्यापैकी एक घटक आहे. त्यामुळे त्वचेची छिद्रे बुजतात आणि त्वचेची जळजळ होते.

स्त्रियांना अॅडल्ट अॅक्नेना अधिक प्रमाणात सामोरे जावे लागते. कधी तो सौम्य असतो, कधी मध्यम स्वरुपाचा तर कधी गंभीर स्वरुपाचा असतो. महिलांच्या हॉर्मोन्सचा चढ-उतार पुरुषांच्या तुलनेने अधिक असल्यामुळे असे घडते. हॉर्मोन्समधील बदलांमुळे पीएचची पातळी असंतुलित होते आणि अतिरिक्त तेलाची (सेबम) निर्मिती होते. हॉर्मोनल अॅक्नेवर लक्ष ठेवा कारण त्याचा खूप त्रास होऊ शकतो. हा अॅक्ने अत्यंत खोल असू शकतो आणि तो पुळीसारखा दिसतो आणि त्यामुळे तो भाग अत्यंत दुखरा होतो.

असे झाल्यावर तुमच्या त्वचेचा उजळपणा परत मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? तेलावर नियंत्रण मिळवणे हा अॅडल्ट अॅक्नेवरील उपाय आहे. काही वेळा ओव्हर द काउंटर (औषधांच्या दुकानातून घेतलेल्या) औषधांमुळे उपाय होण्याच्या ऐवजी अपाय होतो. अशा वेळी नैसर्गिक उपचारांकडे का वळू नये?

निसर्गाकडे चला!

तुमची त्वचा तेलकट होऊ नये म्हणून तुम्ही खालील ३ नैसर्गिक घटकांचा नक्कीच वापर करू शकता:

1. लिंबू: लिंबाचा रस नैसर्गिकरित्या आम्लयुक्त आणि अँटिबॅक्टेरिअल एजंट असतो. त्याच्या एक्सफॉलिअंट गुणधर्मामुळे तो छिद्रे बुजण्याला प्रतिबंध करतो आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतो. लिंबू नव्या त्वचा पेशींना चालनासुद्धा देतो.

2. मुलतानी माती: भारतीयांना मुलतानी माती अपरिचित नाही. या मातीमुळे त्वचेकडून अतिरिक्त तेलनिर्मिती होणे कमी होते, त्याचप्रमाणे त्वचेची छिद्रे बुजण्याला प्रतिबंध होतो. या मातीचा उपयोग दीर्घ काळ केल्यामुळे अॅक्नेचे व्रण जाण्यासही मदत होते.

3. कडुलिंब: कडुलिंबामुळे अॅडल्ट अॅक्ने हाताळणे सोपे जाते आणि तुम्ही अॅडल्ट अॅक्नेच्या समस्येचे निराकरण करू शकता. त्यातील अँटि बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे अॅक्नेसाठी कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया मारले जातात. त्याचप्रमाणे अॅडल्ट अॅक्नेमुळे त्वचेची होणारी जळजळ शमविण्यासाठी आणि त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

कडुलिंबाच्या गुणधर्मांबद्दल जाणून घ्या

भारतीय घरांमध्ये कडुलिंबाचा सर्रास वापर होतो.

प्रत्येक घरातील आईला कडुलिंबाचे गुणधर्म माहीत असतात आणि पदार्थांपासून ते अंघोळीच्या पाण्यापर्यंत प्रत्येकात कडुलिंब समाविष्ट असेल याची विशेषत: उन्हाळ्यात खातरजमा केली जाते. आईच्या ज्ञानाप्रमाणेच हमाम हीसुद्धा वेलनेसची पारंपरिक रेसिपी आहे जी १९३१ पासून चालत आलेली आहे. १००% शुद्ध कडुलिंबाचे तेल, अॅलोव्हेरा आणि तुळशीचा समावेश असलेला हमाम पारंपरिक आणि आधुनिकतेची सांगड घालतो आणि तुम्हाला शुद्ध व सुरक्षित त्वचेची हमी देतो.

तुम्ही घरात राहत असाल किंवा बराच वेळ बाहेर असाल, तुमच्या त्वचेला आवश्यक संरक्षण नक्की द्या!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top