Friday, 24 May, 3.23 am Natural Beauty Secrets

Home
कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याचे ५ फायदे – हमाम

इंडियन लैलाक झाडाची सदाहरीत नाजूक हिरवीगार पाने आणि नाजूक फुले पाहून थकलेल्या डोळ्यांना दिलासा मिळतो. पण कडुलिंब नावाचे हे झाड भारतीयांसाठी प्राचीन काळापासून अनेक आजारांवरील एक रामबाण उपाय आहे. कडुलिंबाची पाने घातलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने अनेक आजार बरे होतात, यात नवल ते काय?

# त्वचाविकार

कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून तो अर्क अंघोळीच्या पाण्यात घातल्याने पुटकुळ्या किंवा चामखीळसारख्या समस्यांचे निवारण होते. कडुलिंबामधील अँटि-मायक्रोबिअल गुणधर्मांमुळे खाज आणि चुरचुरणे कमी होऊन दाह शमतो.

कडुलिंबाची पाने घातलेल्या पाण्यामुळे सोरायसिस आणि एक्झेमासारख्या ऑटोइम्युन त्वचाविकारांवरही उपचार होतात.

# शरीराची दुर्गंधी आणि अॅक्ने

कडुलिंबाची पाने घालून अंघोळ केल्यामुळे शरीराची दुर्गंधी जाते. या वनस्पतीमध्ये असलेल्या जीवाणूरोधक गुणधर्मामुळे हे शक्य होते. पिंपल्स फुटल्यानंतर मागे राहणारे डाग कडुलिंबाच्या पानांमुळे कमी होत जातात. अंघोळ झाल्यानंतर चेहऱ्यावर कडुलिंबाच्या पाण्याचा हबका मारला असता त्वचा नितळ होते आणि पिग्मेंटेशन तसेच ब्लॅक हेड्स येत नाहीत.

# कोंडा

शॅम्पू केल्यानंतर केस कडुलिंबाच्या पाण्याने धुतले तर कोरड्या स्काल्पला दिलासा मिळतो, केसगळती थांबते आणि कोंड्याशी लढा दिला जातो. कडुलिंबामुळे स्काल्पवरील छिद्रे मोकळी होतात आणि ती घट्ट होतात. त्यामुळे केस कोंडामुक्त होतात, त्याचप्रमाणे केस चमकदार आणि मऊ होतात.

# कांजण्या आणि भाजणे

कांजण्या झाल्या असतील तर कडुलिंबाची पाने घातलेल्या पाण्याने हळुवारपणे अंघोळ केल्याने दिलासा मिळतो. हा उपचार फार पूर्वीपासून आपण करत आलो आहोत. त्यामुळे या संसर्गाचा फैलाव थांबतो.

कडुलिंबाची पाने घालून अंघोळ केल्याने भाजलेल्याच्या जखमा बऱ्या होतात. कडुलिंबाच्या जीवाणूरोधक गुणधर्मांमुळे त्वचा लवकर पूर्ववत होते आणि अॅलर्जी व संक्रामित (इन्फेक्टेड) झालेल्या भागाचे संसर्गापासून रक्षण होते.

# डोळ्याला होणारा संसर्ग

डोळे आले (कंजंक्टिवाईटिस) असता कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यास डोळ्यांचे चुरचुरणे कमी होते आणि डोळ्यांमध्ये आलेल्या पुळ्यांपासूनही दिलासा मिळतो.

शरीर दुखत असेल आणि वेदना होत असतील तर कडुलिंबाच्या पानांमुळे दिलासा मिळतोच. त्याचप्रमाणे कडुलिंबाची पाने घातलेल्या पाण्याने त्वचेला पोषण मिळते, ही पाने अँटि-एजिंग एजंट म्हणून काम करतात आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळतो.

कडुलिंबाचे फायदे घेण्यासाठी हमामसारखी उत्पादने वापरा. यात तुळस, अॅलो व्हेरा आणि १००% कडुलिंबाचे तेल आहे, जे त्वचाविकारांपासून वर्षभर रक्षण करते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top