Saturday, 24 Aug, 1.39 am Natural Beauty Secrets

Home
कडुलिंबाला 'सर्व रोग निवारिणी' का म्हणतात

स्त्री असणे हे नेहमीच सोपे नसते. आपण नक्कीच एक निस्वार्थी आयुष्य जगत असतो, ज्यामुळे आपण सतत बिझी आणि उत्साहात असतो. पण काही चुकासुद्धा घडत असतात, हा आपल्या जीवनशैलीचा परिणाम असतो. सतत दगदग केल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो आणि तो सर्वप्रथम आपल्या त्वचेवर दिसतो. प्रदूषण, तणाव आणि काही वेळा जीवनशैली यामुळे त्वचेवर होणाऱ्या परिणामांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हे परिणाम कायमचे राहू शकतात.

उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे अॅक्ने येऊ शकतात. त्वचेवरील बुजलेली छिद्रे आणि अतिरिक्त तेल जमा झाल्यामुळे अॅक्ने येतात. हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे महिलांना ही समस्या अधिक भेडसावते.

या समस्येला कसे हाताळू शकता आणि तुमच्या त्वचेची काळजी कशा प्रकारे घेऊ शकता, ते जाणून घेऊ या.

पारंपरिक मार्ग स्वीकारा , कडुलिंबाचा विचार करा!

अत्यंत प्राचीन काळापासून कडुलिंब हे पारंपरिक भारतीय औषध आहे. वेदांमध्ये याचा उल्लेख 'सर्व रोग निवारिणी' असा कलेला आढळतो. याचा अर्थ सर्व आजारांवर असलेला एकच उपाय असा आहे. किंबहुना त्याचे मूळ दैवी आहे अशी मान्यता आहे आणि त्याला 'कल्पवृक्ष' सुद्धा म्हणतात.

कडुलिंबाचे गुणधर्म

कडुलिंबाचा त्वचेसाठी अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. आजही त्याच्या उपकारक आणि अँटिबॅक्टेरिअल गुणधर्मांकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही. कडुलिंब तुमच्या त्वचेची काळजी घेते आणि तुम्हाला खालील बाबतीत मदत करते:

  • त्वचेचे वाढणारे वय
  • अॅक्ने
  • कोरड्या त्वचेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या

कडुलिंबामध्ये जंतू नष्ट करण्याचा गुणधर्म आहे आणि तो त्वचा मुलायम आणि ओलसर ठेवतो आणि त्वचेला आवश्यक असलेले पोषण देतो. यातील संयुगांमुळे त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतात त्यामुळे त्वचेला पापुद्रे सुटत नाहीत. त्याचप्रमाणे अॅक्नेमुळे येणारा लालसरपणा किंवा जळजळ कमी करण्यास कडुलिंबाची मदत होते.

पारंपरिक पद्धत

'ओव्हर द काउंटर' औषधे सहज उपलब्ध असली तरी ती सर्वच औषधे परिणामकारक नसतात. किंबहुना त्यांच्यापैकी काही औषधे उपाय करण्याऐवजी अपाय करू शकतात. त्वचा हा नाजुक अवयव असल्यामुळे त्वचेची नियमितपणे काळजी घेणे आवश्यक असते. तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या आणि कडुलिंबाला दिनचर्येत समाविष्ट करून घ्या. तुमच्या त्वचेवर अनेकविध उत्पादनांनी प्रयोग करण्याऐवजी हमाम वापरून बघा. यात कडुलिंबाच्या १०० टक्के शुद्ध तेलाचे गुणधर्म आहेत आणि त्वचेच्या समस्यांचे निवारण करण्याची क्षमता आहे. जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता, तेव्हा तुमचे संरक्षण करण्याची क्षमता कडुलिंबामध्ये आहे. #GoSafeOutside

लक्षात ठेवा, जेव्हा त्वचेची काळजी घ्यायची असते तेव्हा नैसर्गिक घटकांवर विश्वास ठेवणे ही चांगली सुरुवात असते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top