Friday, 29 Mar, 4.46 am Natural Beauty Secrets

Home
नैसर्गिक घटक असलेले डे क्रीम अॅक्ने कशा प्रकारे टाळते

अॅक्ने येण्याची शक्यता असलेल्या त्वचेसाठी उत्पादने निवडणे कठीण असू शकते. अशा प्रकारच्या उत्पादनांचा पूरच आलेला आहे. पण अशा वेळी उत्पादन निवडताना तुम्ही एक गुरूमंत्र लक्षात ठेवावाः नैसर्गिक घटक असलेली उत्पादनेच घ्यावीत.

का?

ज्या त्वचेवर अॅक्ने आहेत, त्या त्वचेवर वापरल्या जाणाऱ्या उत्पादनाने जीवाणूंना लांब ठेवणे, दाह कमी करणे आणि त्वचेचे संरक्षण करणे अपेक्षित आहे. दिवसा त्वचेला अतिनील किरणे, प्रदूषण, ताण, मेकअप यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे दिवसा लावण्यात येणाऱ्या क्रीम्सनी त्वचेचे संरक्षण करणे आणि त्वचेला आधार देणे महत्त्वाचे असते.

नैसर्गिक घटक असलेले दिवसा लावायचे लोशन किंवा क्रीम हितकारक राहील. नैसर्गिक आणि ऑरगॅनिक घटक असलेली उत्पादने वापरल्याने त्वचेची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते. ज्या उत्पादनांमध्ये नैसर्गिक घटक नाहीत त्या उत्पादनांमुळे दाह होणे, कोरडेपणा, त्वचा फाटणे अशा प्रकारचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात. पारंपरिक अॅक्नेवरील उपचार खर्चिक असू शकतात आणि त्यामुळे कोरडेपणा, लालसरपणा आणि दाह असे हानिकारक साइड इफेक्ट्स होऊ शकतात. दिवसा लावायचे जे क्रीम तुमच्या चेहऱ्यावर दिवसभर असणार आहे, ते पूर्णपणे नैसर्गिक असणे आवश्यक आहे.

डे क्रीम कसे काम करतात

प्रदूषण किंवा तुमचे थोडेसे दुर्लक्ष झाले असेल तरी डे क्रीमने तुमच्या त्वचेचे संरक्षण करणे अपेक्षित आहे. अॅलोव्हेरा समाविष्ट असलेले क्रीम अत्यंत पोषक असते आणि वातावरण आणि बाहेरील दूषित घटकांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करते. अॅलोव्हेरा त्वचेला थंडावा देते, हायड्रेट करते आणि त्वचेवर संरक्षण कवच तयार करते. अॅलोव्हेराचा समावेश असलेले हलके, चिकट नसणारे आणि हायड्रेटिंग उत्पादन चांगले उत्पादन ठरेल. अॅलोव्हेरामध्ये दाह कमी करण्याचे गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे तुमच्या त्वचेचे चुरचुरणे आणि जळजळणे थांबते.

त्याचबरोबर त्वचेचा दिवसभर सूर्यकिरणांशी संपर्क येईल ही वस्तुस्थिती लक्षात घेता तुमच्या डे क्रीममध्ये एसपीएफ असेल याचीही खातरजमा करा. कारण सूर्यकिरणांपासून संरक्षणही अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रमाणापेक्षा अधिक आणि कोणतेही संरक्षण नसताना उन्हात गेल्यामुळे लालसरपणा, दाह होणे, वेळेआधीच त्वचेचे वय वाढणे, निस्तेजपणा, कोरडेपणा आणि त्वचा फाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

तुम्ही सुयोग्य डे क्रीम निवडता तेव्हा काय होते?

तुमच्या चेहऱ्यावर जे दिवसभर असणारे डे क्रीमसारखे उत्पादन चिकट नसावे. अन्यथा ते धुलिकण आणि दूषित घटक त्वचेकडे आकर्षित करते. डे क्रीम ही बहुधा कॉस्मेटिक्सच्या खालच्या थरावर लावण्यासाठी तयार केलेली असतात. त्यामुळे ती हलकी, नॉन-ग्रीसी फॉर्म्युलाने तयार केलेली असतात. ही क्रीम पटकन झिरपतात आणि त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात. क्रीम चिकट असेल तर वातावरणातील दूषित घटक तुमच्या त्वचेवर चिकटतील आणि तुमच्या त्वचेवरील छिद्रे बुजवून टाकतील. आणि ही छिद्रे जेव्हा बुजतात तेव्हा काय होते, हे आपल्याला माहीतच आहे. ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स, पिंपल्स, लालसरपणा आणि दाह होतो. जेव्हा तुमच्या त्वचेवरची छिद्रे तेल व मृत त्वचेमुळे बुजलेली असतात तेव्हा अॅक्ने यायला लागतात. अशी परिस्थिती टाळणे हेच याचे गमक आहे. तुमची त्वचा चिकट न करता संरक्षण करणारे क्रीम अत्यावश्यक आहे.

तुमच्या डे क्रीमशिवाय तुमच्या शरीरात काय जाते, तेही महत्त्वाचे असते. तुमच्या आहारातून जाणारे नैसर्गिक पदार्थही महत्त्वाचे असतात. यात चांगली चरबी आणि हिरव्या पालेभाज्या आणि भाज्या समाविष्ट आहेत. त्याचा निश्चितच तुमच्या त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो. खूप पाणी प्यायल्यानेसुद्धा त्वचा डिटॉक्सिफाय होते आणि त्वचा स्वच्छ होऊन ती सुदृढ राहते. कॅफिनच्य सेवनावर मर्यादा आणल्यानेसुद्धा अॅक्ने लांब राहतात.

सारांश हा की, अॅक्ने येणाऱ्या त्वचेसाठी कोणताही एकच उपाय नाही. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे उपचार आहेत. आपण नैसर्गिक घटक समाविष्ट असलेली उत्पादने निवडली तर चांगल्या व सुदृढ त्वचेची खातरजमा होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top