Saturday, 24 Aug, 1.31 am Natural Beauty Secrets

Home
नैसर्गिकपणे केशसंभार वाढविण्याचे ८ मार्ग

डरमॅटॉलॉजिस्टनुसार दिवसाला ५० ते १०० केस गळणे सामान्य असते. पण हा आकडा वाढतो तेव्हा केशसंभार कमी होतो. केसांचा पोत आणि रंग यासाठी अनुवंशिकतेचीही महत्त्वाची भूमिका असते. असे असले तरी मोहक केस प्राप्त करण्यासाठी तुम्ही काही पावले निश्चितच उचलू शकता. ती आहेत खालीलप्रमाणे -

  • रसायनांपासून दूर रहा

केसांवर रासायनिक ट्रीटमेंटमुळे शाफ्टला अपाय होतो आणि केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केसही पातळ होतात. स्ट्रेटनिंग, रंग लावणे, पर्मिंग इत्यादींमुळे केस नाजूक होतात. अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स चार आठवडे केल्या नाहीत तर तुम्हाला केशसंभारातील फरक दिसून येईल.

  • तेलाने मसाज

तेल लावल्याने आणि स्काल्पला मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि नवे केस उगवण्याची शक्यता वाढते. तेल थोडेसे गरम करा आणि स्काल्पर वर्तुळाकारात मसाज करा. इंदूलेखासारख्या तेलांमुळे फॉलिकल्स (केसांची मुळे) उद्दिपित होतील आणि त्यातील नैसर्गिक घटकांमुळे केशसंभार सुधारेल. इंदूलेखा तेलात कडुलिंब, भृंग, कोरफड हे घटक आहेत. त्यामुळे केसांची वाढ होते आणि केसगळती थांबते.

  • नैसर्गिक घटक असलेली उत्पादने

सिलीकोन्सचे प्रमाण कमी असलेली उत्पादने वापरण्यास सुरुवात करा. नैसर्गिक उत्पादनांमुळे तुमच्या केसांच्या मुळांवर कसलाही थर साचणार नाही. उत्पादने मुळांशी साचली तर केस मलूल वाटतात. जड असलेली उत्पादने टाळली तर तुमचा केशसंभार परत मिळेल.

  • तपासणी करून घ्या

केस अचानक पातळ व्हायला लागले तर ते कसल्यातरी कमतरतेचे आणि इतर आजाराचे लक्षण आहे. थायरॉइडसारख्या आजारांमुळे केसगळती होऊ शकते किंवा ते पातळ होऊ शकतात. या शक्यता नसल्याची खातरजमा करण्यासाठी तपासणी करून घ्यावी.

  • व्हॉल्युमिनस हेअर कट करावा

केस कापताना सर्व केस एकाच लांबीचे कापले तर ते पातळ दिसतात. ज्या हेअरकटने तुमच्या केसांच्या व्हॉल्युममध्ये विविध लेयर्ससह भर पडेल आणि त्यांना बाउन्सी लूक मिळेल असा हेअरकट करा.

  • केस विंचरण्याची पद्धत बदला

स्टाइल कोच आणि ब्लॉगर अयाना धिल्लन (https://www.instagram.com/aianajsays/), यांनी आम्हाला सांगितलं की, ती तिचे डोके पूर्णपणे मागच्या बाजूला करून केस विंचरते आणि त्यामुळे तिला लगेचच व्हॉल्युम मिळतो. तुमचे केस मलूल दिसत असतील आणि तुम्हाला लगेचच व्हॉल्युम हवा असेल तेव्हा ही क्लृप्ती वापरा.

  • स्टायलिंग उत्पादने सांभाळून वापरा

बहुतेक स्टायलिंग उत्पादने केस खाली बसवतात आणि ते मलूल दिसतात. काही आठवडे स्टायलिंग उत्पादने वापरू नका आणि तुमचे केस निश्चितच झुपकेदार दिसू लागतील.

  • तणावमुक्त व्हा!

केसगळती आणि केस पातळ होण्यासाठी मानसिक ताण हे एक महत्त्वाचे कारण आहे. याच कारणामुळे कमी वयातच केस पांढरे होऊ लागतात. मसाज, योगा आणि ध्यानधारणा यासारख्या रिलॅक्स करणाऱ्या गोष्टी करून पाहा. रात्री झोपताना एखादे पुस्तक वाचून झोपावे किंवा रिलॅक्स करणारे संगीत ऐकावे. त्याची मदत होऊ शकेल. हेड मसाजसह हेअर स्पा करून घेतला तर त्यानेही खूप फरक पडू शकेल.

  • सकस आहार घ्या

सुदृढ केसांसाठी सकस आहार महत्त्वाचा आहे. केसांची वाढ चांगली व्हावी आणि केसांना चमक मिळावी यासाठी हिरव्या पालेभाज्या, अंडी, बदाम आणि मासे तुमच्या आहारात असावेत. त्याचप्रमाणे तुम्ही भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे, जेणेकरून तुम्ही हायड्रेटेड राहाल.

या टिप्सचा अवलंब केला तर तुमचे केस अधिक आनंदी आणि सुदृढ होतील!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top