Saturday, 24 Aug, 1.27 am Natural Beauty Secrets

Home
प्रत्येक स्त्रीने खालील ७ मेक-अप इसेन्शिअल्स आपल्या बॅगमध्ये सोबत घ्याव्यात

मोबाईल फोन - घेतला. घराच्या किल्ल्या - घेतल्या. प्रवासात वाचण्यासठी पुस्तक - घेतले. ब्रेथ मिंट्स - घेतल्या. ऑफिसला जाताना तुमच्या बॅगेत अजून काय घ्यायला हवे याचा विचार करत आहात का? नोकरदार महिलेला आवश्यक असलेल्या मेक-अपच्या वस्तू आपण कशा विसरू शकतो?

तुम्ही मोठी बॅग घेत असाल किंवा किमान वस्तू मावणारी छोटी बॅग, खालील ७ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत.

१. एक चांगला कोल (काजळाची स्टिक): स्मोकी, बिनधास्त, गर्ल नेक्स्ट डोअर - तुमचा लुक कसाही असू दे पण मेक-अप करण्याचे हे साधन तुम्ही नेहमी सोबत ठेवावे. तुमच्या एका स्ट्रोकने डोळ्यांमध्ये थोडेसे नाट्य उतरवा आणि त्यांना उठाव द्या. मीटिंग रुममधील प्रत्येकाची नजर तुमच्याकडे वळेल!

3. लिप बाम किंवा लिपस्टिक: चिअरफुल रेड किंवा सॅसी पिंक रंग तुमच्या ओठांवर लावून तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये ताजेपणाचा रंग समाविष्ट करा. टिंटेड लिप बाम तुमचे ओठ मऊ ठेवतोच, त्याचप्रमाणे तुमच्या दिवसाला एक प्रकारचा उजळपणा बहाल करतो. त्यातही तो फ्लेव्हर्ड म्हणजेच तुमच्या आवडत्या फळाची चव असणारा लिपबाम असेल तर अजून काय हवे! स्ट्रॉबेरी हवी का?

4. सौम्य सुगंध: ताज्या हवेचा अनुभव घेण्यासाठी चांगले परफ्युम किंवा बॉडी मिस्ट हे उत्तम पर्याय ठरतात! सौम्य आणि बराच काळ राहणाऱ्या सुगंधाने तुमचा आणि तुमच्या आजुबाजूला वावरणाऱ्यांचा दिवस तजेलदार करा. तुमचे अस्तित्व जाणवून द्या.

5. कन्सिलर: हा आहे मेक-अपमधला सुपरहिरो! तुमच्या त्वचेच्या रंगाशी जुळणारा चांगला कन्सिलर लावून अॅक्नेचे व्रण, डाग आणि डोळ्यांखाली असलेल्या डार्क सर्कल्सना निरोप द्या. एक टच-अप करा आणि डोळ्याखाली उतरलेला मेक-अप पुसला जाईल.

6. फाउंडेशन: तुमच्या त्वचेचा पोत एकसारखा नसेल तर फाउंडेशनचा वापर करून तुम्ही तुमची कांती एकसमान करू शकता. नैसर्गिकपणा राखणे हे याचे मूळ तत्व आहे, त्यामुळे तुमच्या त्वचेच्या रंगाशी जुळणाऱ्या रंगाचे फाउंडेशन लावा.

7. कॉम्पॅक्ट किंवा प्रेस्ड पावडर: कन्सिलर आणि फाउंडेशन लावल्यावर थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर लावा. तसे केल्याने तुमची त्वचा ऑइल-फ्री दिसेल.

8. डे क्रीम: निस्तेज त्वचा बघवत नाही? अॅलो व्हेरा जेल असलेले डे क्रीम लावा. नैसर्गिक अॅलो व्हेरा अर्क असलेले हे लॅक्मे ९ टू ५ नॅचरॅल डे क्रीम तुम्ही आठवणीने सोबत घ्या. जास्त ऊन असल्यास क्रीमच्या SPF 20 PA++ मुळे तुमच्या त्वचेचे घातक यूव्ही किरणांपासून संरक्षण होते. या क्रीमच्या नियमित वापराने तुमच्या त्वचेची नैसर्गिक चकाकी आणि उजळपणा परत मिळतो.

तात्पर्य

मग, यापैकी कोणत्या वस्तू तुमच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाल्या आहेत? तुमचा मेक-अप पाउच घ्या आणि या अत्यावश्यक वस्तू त्यात लगेच भरून ठेवा. तुम्ही शैलीदारपणे जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुमचे तुमच्या कामावर पूर्ण नियंत्रण असेल आणि तुमच्यासमोर येणारी प्रत्येक परिस्थिती हाताळण्यास तुम्ही सज्ज असाल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top