Friday, 24 May, 2.50 am Natural Beauty Secrets

Home
SPF आणि डे क्रीमबाबत खालील माहिती तुम्हाला असावी

फाउंडेशन - लावले. मॉइश्चरायझर - लावले. लाइट मेक अप - लावला. SPF प्रोटेक्शन? अम्म्म, मला त्याची गरज आहे का?

हो, नक्कीच आहे! तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या चेहऱ्याला उजळपणा देणारी उत्पादने लावणे हे प्रदूषण व धुळीपासून रक्षण करण्यासाठी पुरेसे आहे, तर पुन्हा विचार करा. कॉस्मेटिक उत्पादने पुळ्या झाकत असली तरी ही उत्पादने त्वचेचे सखोल पोषण करत नाहीत.

कडक ऊन आणि शहरातील हवेमधील दूषित घटक तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर लघुकालीन आणि दीर्घकालीन दुष्परिणाम करतात. ते पुढीलप्रमाणे.

पृथ्वीभोवती असलेले ओझोन वायूचे आवरण विरळ होत चालल्यामुळे घातक अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरण तुमच्या त्वचेचे नुकसान करतात. यूव्हीबी किरणे ही सनबर्नसाठी कारणीभूत असतात तर यूव्हीए किरणे त्वचेमध्ये खोलवर जातात आणि सुरकुत्या पडणे किंवा त्वचा मुदतीआधीच जीर्ण होणे, असे परिणाम दिसून येतात.

Top