Friday, 17 May, 4.19 am Natural Beauty Secrets

Home
त्वचा खरोखर सुंदर करणारे ७ उपाय

नियतकालिकांमध्ये त्वचेची काळजी घेण्याच्या विविध उपायांबद्दल असलेल्या लेखांमध्ये तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेबद्दल लिहिलेले असते. पण ऑफिसमध्ये होणारा उशीर, बाजारहाट आणि रोजच्या व्यायामातून स्वत:च्या त्वचेचे चोचले पुरविण्यासाठी कुणाला वेळ आहे?

थांबा, अजूनही वेळ गेलेली नाही! या जलद उपायांसाठी तुम्ही थोडासा वेळ काढला तर अजूनही तुमची त्वचा सुंदर दिसू शकते.

१. आइस, आइस बेबी

बर्फामुळे काही सेकंदांत तुमचा चेहरा उत्साही दिसू शकतो. तुमचा चेहरा बर्फाच्या पाण्यात बुचकळा किंवा चेहऱ्यावरून मिनिटभर बर्फाचा तुकडा फिरवा. बर्फामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रे बुजली जातात आणि धुलिकण, बॅक्टेरियांना तुमच्या त्वचेमध्ये शिरू देत नाही. आइस बाथमुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा वॉर्म अप होते आणि तुमच्या त्वचेला चकाकी प्राप्त होते.

२. घरगुती मास्क चे मॅजिक

सुदृढ, उजळ त्वचेसाठी घरगुती मास्क उपयुक्त असतात. डाळीचे पीठ, हळद आणि दही यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावा किंवा ओटमील मास्कही वापरू शकता. ओटमील तयार करा आणि त्याला रुम टेंपरेचरला येऊ द्या आणि मग ते चेहऱ्याला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावून वाळू द्या, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हाही चांगला उपाय आहे.

३. क्रीमची पॉवर

तुम्ही मेकअप करत असा किंवा नसा, तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. अ, क, ई आणि के जीवनसत्व असलेली नाइटक्रीम चेहऱ्याला आणि डोळ्यांना लावल्याने सुरकुत्या पडत नाहीत आणि काळी वर्तुळे तयार होत नाहीत. तुम्ही झोपेत असताना ही क्रीम्स आपले काम करतात. दररोज शहरातील प्रदूषण आणि मळ यांना सामोऱ्या जाणाऱ्या त्वचेसाठी डे क्रीम्स महत्त्वाची असतात. अॅलो व्हेरा सारखे नैसर्गिक घटक असलेली क्रीम्स वापरा. ही क्रीम्स त्वचेमध्ये खोलवर जातात आणि ती हवेतील दूषित घटकांपासून त्वचेचे रक्षण करतात.

४. उपयुक्त चहा

नाही, तुम्हाला चांगले दिसण्यासाठी चहाचे कपच्या कप रिचवायची गरज नाही. पण डोळे फुगीर वाटत असतील तर टी बॅग्ज थंड पाण्यात बुडवून तुमच्या डोळ्यावर ठेवा, लगेचच दिलासा मिळेल. थंड टी बॅग्ज डोळ्यावर ठेवल्या तर डोळ्याखाली तयार होणाऱ्या काळ्या वर्तुळांपासून दिलासा मिळतो. त्याचप्रमाणे अॅक्नेवर ठेवल्या असत्या दाह कमी होतो आणि अॅक्ने लवकर बरे होतात.

५. तुमच्या चिंता मसाज करून घालवा

सुजलेले डोळे, सुरकुत्या आणि निस्तेज कांती ही दैनंदिन मानसिक ताणाची लक्षणे आहेत. बोटांनी मसाज करून यावर दिलासा मिळू शकतो. तुमच्या मरंगळीने डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांपासून बाहेरच्या कोपऱ्यांपर्यंत मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि डोळ्याखालील रेषा कमी होतात. चेहऱ्याला मसाज केल्याने कोलॅजेनला चालना मिळते आणि तुम्ही वापरत असलेली स्कीन केअर उत्पादने अधिक सक्रिय होतात.

६. स्वच्छता राखा

तुम्ही तुमची स्कीनकेअर उत्पादने बदलून किती दिवस झाले? मेक-अप ब्रश, हेअर स्टायलिंग उत्पादने, रेझर्स आणि ट्रीमर्स ही तुमच्या त्वचेच्या संपर्कात येणारी सर्व साधने स्वच्छ ठेवावीत. तुम्ही जी स्कीन केअर उत्पादने वापरता त्यांची एक्स्पायरी डेट तपासून घ्या. ही उत्पादने नियमितपणे बदला, जेणेकरून त्यावरील बॅक्टेरिया तुमच्या त्वचेमध्ये जाणार नाहीत.

७. योग्य पद्धतीने झोपा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top