Friday, 29 Mar, 7.34 am Natural Beauty Secrets

Home
त्वचा तलकट आहे? दिवसभर चेहऱ्यावर मॅट फिनिश कसा ठेवावा याच्या काही टिप्स ब्लॉगर नम्रता यादव येथे सांगत आहेत

मला तेलकट चेहरा खूप आवडतो, असे कोणतीही महिला कधीही म्हणणार नाही! गैरसमज करून घेऊ नका, पण अंघोळ केल्यानंतर असलेला थोडासा ओलसर त्वचेचा लुक मला आवडतो. तुमच्या हायलायटरची चमक तुमच्या गालावरही दिसणे आणि तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक इंचावर तेलकट थर असणे यात प्रचंड फरक आहे. कारण ती तेलकट चमक कुणालाच आवडत नाही. पण फार चिडचिड करू नका कारण तुम्ही एकट्या नाही आहात! कारण अशी समस्या अनेकींपुढे असते.

तुमच्या त्वचेचा प्रकार कसाही असो, तुम्हाला तुमच्या त्वचेला दिवसभर मॅट लुक द्यायचा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आल्या आहात. इथे तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही अतिरिक्त तेलकटपणा टाळू शकाल.

#१. ब्लॉटिंग पेपर जवळ बाळगा

तुमचा चेहरा जास्तच तेलकट झाला तर ब्लॉटिंग पेपरचा वापर करा. तुमच्या चेहऱ्यावर तो लावा आणि काढून टाका. सौंदर्यप्रसाधने मिळणाऱ्या कोणत्याही दुकानात तुम्हाला ब्लॉटिंग पेपर मिळू शकेल.

#२. आठवड्यातून एक-दोन वेळा एक्सफॉलिएट करा

एक्सफॉलिएट करण्यास विसरू नका. तुमच्या चेहऱ्याची त्वचा तेलकट आहे म्हणून तुम्हाला उग्र स्क्रब ने तो घासायची गरज नाही. बाजारात अनेक सौम्य एक्सफॉलेएटर्स उपलब्ध आहेत, जे तुमच्या त्वचेची हळुवार काळजी घेतील आणि छिद्रांमधील धुलिकण आणि तेल काढून टाकून तुमची त्वचा घट्ट करतील. ही कृती हळुवार करा आणि अति प्रमाणात करू नका, कारण त्यामुळे त्यामुळे सूक्ष्म भेग पडू शकते आणि संसर्ग होऊ शकतो.

#३. हलके, तेलरहीत मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावर लावा

तुमच्या शरीरातून होणाऱ्या तेलाच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हलके आणि तेलमुक्त मॉइश्चरायझर वापरा. ते टाळू नका.

#४. तुमचा मेक-अप लावण्याआधी प्रायमर लावा:

प्रायमर लगेचच अतिरिक्त तेल शोषून घेते आणि तुमच्या त्वचेला स्मूथ, वेलवेटी फिनिश देते. मी लॅक्मे अॅलो डे क्रीम अॅक्वा जेलचा प्रायमर म्हणून वापर करते आणि दिवसभर टिकून राहणाऱ्या शाइन-फ्री टी-झोनसाठी (चेहऱ्यासाठी) त्यावर सढळ हस्ते लावते. याचा अजून एक फायदा हा की, थोड्या मोठ्या छिद्रांनाही हा प्रायमर धुसर करतो आणि मेकअपसुद्धा फिका पडत नाही.

#५. टिंटेड मॉइश्चरायझर/बीबी क्रीम वापरा

काही वेळा, विशेषतः बाहेरचे हवामान उष्ण असेल तर फाउंडेशन लावणे खूप जड वाटते. ते विरघळून त्वचेच्या छिद्रांमध्ये जाते आणि ती बुजवते. परिणामी अधिक तेलाची निर्मिती होते. त्यामुळे टिंटेड मॉइश्चरायझर किंवा बीबी/सीसी क्रीम लावा जी खूप हलकी असतात आणि अशा क्रीम्समुळे सुयोग्य कव्हरेजही मिळते! त्यात सनस्क्रीनही असते!

#६. मॅट/तेलरहीत फाउंडेशन वापरा

ज्या दिवशी तुमच्या त्वचेला अधिक कव्हरेजची आवश्यकता असेल आणि टिंटेड मॉइश्चरायझरचा उपयोग होणार नसेल तर तुम्ही फाउंडेशन वापरू शकता. फक्त ते फाउंडेशन तेलरहीत असेल याची खातरजमा करा किंवा क्षाररहीत पावडर फाउंडेशनचा पर्याय निवडा. ते फाउंडेशन अतिरिक्त तेल स्पंजसारखे शोषून घेते.

#7. रात्री लावायचे क्रीम हलके असू द्या

रात्री सौंदर्यप्रसाधनांच्या वापराची पातळी खाली आणा, असे मी तुम्हाला सुचवेन. म्हणजे तुम्ही क्रीम नियमितपणे वापरत असाल तर लोशनचा पर्याय निवडा. तुम्ही लोशन वापरत असाल तर हायड्रेटिंग सेरम वापरा. त्याचप्रमाणे ते क्रीम तुम्ही कुठे लावताय याची दक्षता घ्या. म्हणजे क्रीम किंवा लोशन नाकावर लावू नका कारण त्या भागात पुरेशा तैलग्रंथी असतात!

#८. फाउंडेशनवर लावण्यात येणारी सर्व सौंदर्यप्रसाधने तेलरहीत असतील याची खातरजमा करून त्यांचा वापर करा

तुम्ही इतर कोणताही मेकअप करण्याचे ठरवलेत तरी तुमची त्वचा मॅट आणि कोरडी ठेवणारी तेलरहीत सौंदर्य प्रसाधने वापराल याची तुम्ही खातरजमा करून घ्या.

#. चेहरा धुण्यासाठी शाइन-कंट्रोल क्लीन्सरचा वापर करा

अतिरिक्त तेल काढून टाकणे कधीही चांगले असते.


#१०. आहाराकडे लक्ष द्या

जिन, वाईन किंवा सिंगल मॉल्टचा प्याला, सोबत गरमागरम पिझ्झा आणि इतर साइड ऑर्डर्स हेही तुमच्या चेहऱ्यावरील तेलकट त्वचेला कारणीभूत ठरणारे घटक असतात! ते रक्तवाहिन्या रुंद करतात आणि तुम्हाला खूप घाम येतो. परिणामी जास्त तेलनिर्मिती होते! तुम्ही हे पूर्णपणे टाळू शकत नसलात तरी तुमच्या आहारात गाजर, पपई, हिरव्या भाज्या आणि अ जीवनसत्वयुक्त असलेल्या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे तेलनिर्मितीचे प्रमाण कमी होते.

तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल टाळण्यासाठी आणि दिवसभर मॅट लुक बाळगण्यासाठी या गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक होते.

तुमच्या मैत्रिणींना आणि ओळखीच्या महिलांशी या टिप्स शेअर करा.

या शिफारसी फॅशन आणि लाइफस्टाइल ब्लॉगर नम्रता यादव यांनी शेअर केल्या आहेत.

तुम्ही त्यांच्या पोस्ट http://thenrage.com/ आणि https://www.instagram.com/namrata_thenrage/ या त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर फॉलो करू शकता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top