Friday, 31 May, 5.18 am Natural Beauty Secrets

Home
त्वचेची काळजी घेण्याच्या तुमच्या दिनचर्येमध्ये नाईट क्रीम का समाविष्ट असावे

शहरी आयुष्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो आणि हे तुम्हाला माहीत असेलच! मीटिंगला, पार्टीला किंवा मॉलमध्ये जाताना तुम्ही मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि हलका मेकअप लावता. तुमची त्वचा दिवसभर प्रदूषण, यूव्ही किरणे, जीवाणू आणि धुलिकणांना सामोरी जात असते.

दिवसा तुमची त्वचा 'प्रोटेक्शन मोड'मध्येच असते आणि तुमची अँटिऑक्सिडंट व एसपीएफयुक्त क्रीम्स त्वचा जीर्ण होण्यापासून आणि त्वचेचा दाह होण्यापासून रक्षण करत असतात. पण रात्री झोपण्यापूर्वी आपल्यापैकी अनेक जण दिवसभराचा चेहऱ्यावर साचलेला मळ धुवून टाकत नाहीत. यापेक्षा मोठी चूक असूच शकत नाही!

किंबहुना, रात्री त्वचा आराम करते आणि आपल्या बायोऱ्हिदमनुसार 'रिपेअर मोड'मध्ये जाते. संशोधनातून असेही दिसून आले आहे की, दिवसाच्या तुलनेने रात्रीच्या वेळी त्वचा सक्रिय घटक अधिक प्रमाणात शोषून घेते. आणि रात्री झोपेत त्वचेच्या पेशीनिर्मितीचा वेग अधिक असतो. त्यामुळे नाईट क्रीमच्या माध्यमातून त्वचेचे पोषण करण्यासाठी हीच योग्य वेळ असते.

चांगले नाईट क्रीम तुमच्या चेहऱ्यावरून धुळ काढून टाकते, त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील पेशींचे नूतनीकरण करते आणि टिश्यूंचे नुकसान होण्याला प्रतिबंध करते. तुमच्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येमध्ये नाईट क्रीमचा समावेश का करावा याची कारणे खालीलप्रमाणे -

हायड्रेशन - ऊन आणि प्रदूषणामुळे तुमची त्वचा दिवसभर डिहायड्रेट होत असते. त्याचप्रमाणे जंक फूड आणि अपुरे पाणी पिण्याची त्यात भर पडत असते. तुमच्या चेहऱ्याच्या लवकर कोरड्या होणाऱ्या भागांना नाईट क्रीम पोषण पुरवते.

रक्ताभिसरण - रात्री रक्ताभिसरण अधिक वेगात होते आणि स्कीन केअर उत्पादनांमधील पोषक घटकांना अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते. नाईट क्रीम लावल्यामुळे सकाळी तुमच्या त्वचेला ताजेपणा व उजळपणा प्राप्त होतो.

कमी सुरकुत्या, जास्त तन्यता - नाईट क्रीममधील पोषक घटकांमुळे तुमची त्वचा मरगळलेली दसत नाही आणि ही क्रीम्स त्वचेची तन्यता पुनर्स्थापित करण्यास मदत करतात आणि ती घट्ट दिसू लागते. त्वचेचा रंग सगळीकडे सारखाच असेल आणि त्वचेचा पोत तलम राहील याची खातरजमा नाईट क्रीम करते.

पेशींची पुनर्निर्मिती आणि त्वेचेचे पोषण - दिवसभर त्वचेवर होणाऱ्या रसायनांच्या आणि दूषित घटकांच्या माऱ्यामुळे त्वचेचा जो दाह होतो, त्याच्याशी नाईट क्रीम लढा देते आणि चेहऱ्याचा दाह कमी करते. टिश्यु दुरुस्त करण्यासाठी पेशींच्या नवनिर्मितीला चालना देण्याच्या उद्दिष्टाने तयार करण्यात आलेल्या या नाईट क्रीमने मसाज केल्यामुळे चेहऱ्याला ताजा व उजळ लुक प्राप्त होतो.

नाईट क्रीम्स कुणासाठी असतात?

त्वचेच्या सर्व प्रकारांसाठी आणि गरजांसाठी नाईट क्रीम्स उपयुक्त असतात. चेहऱ्याची त्वचा निरोगी राहावी यासाठी वयाच्या विशीपासून सर्वांनीच या क्रीम्सचा वापर केला पाहिजे. चेहऱ्यावरील दोष बरे करण्यासाठी त्वचा जीर्ण होण्याच्या लक्षणांना प्रतिबंध करण्यासाठी वयस्कर महिलांना याचा अधिक फायदा होतो.

नाईट क्रीम कसे वापरावे?

नाईट क्रीम लावून वरच्या बाजूला, बाहेरच्या दिशेने चेहऱ्याला व मानेला मसाज करण्याआधी दिवसाच्या शेवटी क्निसिंग आणि टोनिंग करणे गरजेचे असते.

नाईट क्रीमचे कार्य किती वेळाने सुरू होते?

दीर्घकालीन विचार करता नाईट क्रीममधील गुंतवणूक लाभादायक ठरते. यातून एका रात्रीत परिणाम दिसून येत नाही. त्वचा पुनरुज्जीवीत होण्यासाठी साधारण महिन्याभराचा काळ जावा लागतो. त्यामुळे रात्री नाईट क्रीम लावण्यासाठी तुम्ही जी थोडीफार मिनिटे घालवता, त्यामुळे काही आठवड्यांनी तुमची त्वचा सुंदर दिसू लागते. आणि तुम्ही झोपेत असताना हे साध्य करू शकाल. लॅक्मे ९ टू ५ नॅचरल नाईट क्रीम सारखे अॅलो व्हेरा जेल समाविष्ट असलेले क्रीम वापरले तर ते त्वचेची आतून दुरुस्ती करते आणि पोषण देते. अॅलो व्हेरा आणि नाईट क्रीमच्या मिश्रणामुळे तुमची त्वचा उजळ होते आणि मजबूत होते. परिणामी तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा प्राप्त होते.

कसे लावावे?

पायरी १: तुमच्या बोटाच्या अग्रांवर नाईट क्रीम लावा.

पायरी २: चेहऱ्यावर क्रीमचे ठिपके लावा आणि वरच्या व बाहेरच्या दिशेने मसाज करा.

पायरी ३: पूर्ण ट्रीटमेंट करण्यासाठी हे क्रीम तुमच्या मानेलाही लावा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top