Friday, 31 May, 5.44 am Natural Beauty Secrets

Home
उन्हाळा, आर्द्रतेमुळे तुमच्या त्वचेचे व्यापक नुकसान होऊ शकते - त्याचा सामना कसा करावा

तुम्हाला माहीत आहे का, आर्द्रतेमुळे तुमची त्वचा जास्त तेलकट आणि चिकट होते, हा गैरसमज आहे. किंबहुना, घामाचे हळुहळू बाष्पीभवन झाले किंवा झालेच नाही तर तुमच्या त्वचेवरील छिद्रे बुजतात. छिद्रे बुजल्यामुळे अॅक्ने येतात, पुरळ उठते आणि चट्टे पडतात, ज्यामुळे तुमची त्वचा रोगट दिसते.

तुम्हाला त्वचेच्या काही समस्या असल्या किंवा नसल्या तरी सतत आर्द्रतेत राहत असाल तर तुमच्या त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमच्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला संतुलन साधावे लागते.

आठवतंय का, जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरील तेल पुसताना किंवा पिंपल फोडण्याचा प्रयत्न करताना तुमची आई तुम्हाला हात लांब ठेवायला सांगत असे. आजही तो सल्ला फायदेशीर ठरेल. तुम्ही १००% जीवाणूरोधक असलेल्या कडुलिंब आणि अॅलो व्हेरा या घटकांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि याचा अजून एक फायदा म्हणजे ही उत्पादने तुमची त्वचा थंड करतात आणि म्हणूनच ती उन्हाळ्यात वापरणे अत्यावश्यक आहे.

तुम्हाला १००% शुद्ध कडुलिंबाचे तेल मिळाले तर तुम्ही एका आश्चर्याचे साक्षीदार होणार आहात. हे एक सर्वांना परिचित असलेले अँटिबॅक्टेरिअल आहे, जे त्वचेवरील पुळ्यांपासून संरक्षण करते आणि लालसरपणा व चुरचुरणेदेखील थांबवते.

कोणत्याही प्रकारच्या वातावरणात #GoSafeOutside साठीच्या टिप्स खाली दिल्या आहेत:

१. हायड्रेटेड राहा

दिवसाला किमान १० ग्लास पाणी प्यावे.

मॉइश्चरायझर वापरा. हो. मॉइश्चरायझर उन्हाळ्यात तुमच्या त्वचेचे रक्षण करतील. चिकट न करणारे मॉइश्चरायझर निवडा. एसपीएफ असलेले मॉइश्चरायझर लावले तर कडक सूर्यकिरणांपासूनही तुमच्या त्वचेचे संरक्षण होईल.

२. छिद्रे बुजू देऊ नका

फेसवॉश सारखा वापरला तर तुमची त्वचा कोरडी होईल. त्यापेक्षा नियमितपणे चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारा, जेणेकरून तुमच्या त्वचेवरील छिद्रे बुजणार नाहीत. त्याचप्रमाणे शक्यतो कडुलिंबाचा समावेश असलेले सौम्स क्लिन्सर वापरा.

३. सादर करत आहोत कडुलिंबाचे तेल

अँटिसेप्टिक, अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरिअल गुणधर्म असलेले कडुलिंब समाविष्ट असलेली स्कीन केअर उत्पादने वापरा. हमामसारखी तुळस व अॅलो व्हेरा व १००% कडुलिंबाचे तेल असलेली उत्पादने वापरा. त्यामुळे अॅक्नेपासून ते चट्टे व सनबर्न्सपर्यंत त्वचेच्या सर्व समस्या दूर ठेवता येतात.

४. सनस्क्रीन अत्यावश्यक आहे

तुम्ही जेव्हा बाहेर असता तेव्हा उन्हाचा तुमच्या त्वचेला सर्वाधिक त्रास होतो. तुमचे डोके आणि डोळे सांभाळणे हा फक्त एक भाग झाला. तुमच्या त्वचेलाही तेवढ्याच संरक्षणाची गरज असते. जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीन लावण्यास विसरू नका. ते तुमच्या त्वचेचे संरक्षण करेल.

वर्षभर संरक्षण

प्रत्येकालाच वर्षभर उत्तम दिसावेसे वाटते. नैसर्गिक घटक नसलेली उत्पादने लाभदायक ठरण्याऐवजी नुकसान करू शकतात. नैसर्गिक उत्पादन तुम्हाला आर्द्रतेशी सुरक्षित लढा देण्यास मदत करते. खूप उन्हाळा असेल किंवा खूप पावसाळा असला तरी #GoSafeOutside तुम्हाला हवी असलेली तजेलदार त्वचा वर्षभर मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top