Saturday, 24 Aug, 1.30 am Natural Beauty Secrets

Home
वेदिक काळापासून कडुलिंबाला दैवी उपाय का म्हणतात

भारतीय संस्कृतीमध्ये पुजा साहित्यामध्ये आणि घरगुती कामांमध्ये कडुलिंबाचा वापर केला जातो. आजही दात घासण्यासाठी त्याचा वापर करतात. कांजिण्यांसारख्या त्वचा विकारांवर पाण्यात कडुलिंबाची पाने घालून उपचार करण्यात येतात.

आध्यात्मिक बाजूचा विचार करता कडुलिंबाची फुले आणि हार श्रद्धापूर्वक देवांना घालतात. कडुलिंब हा काही देव व देवींचा अवतार मानला जातो. ही मान्यता इतकी आहे की, भारतातील काही भागांमध्ये कडुलिंबाच्या झाडाला नीमरी देवी म्हणतात. भाविकांसाठी कडुलिंबाची फुले आणि पाने दुष्ट प्रवृत्तींना दूर घालविण्यासाठी वापरतात.

किंबहुना, कडुलिंब भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे.

कडुलिंब: आपली चालू परंपरा

भारतात अनेक परंपरा आजही पाळल्या जातात, ज्या निसर्गातील सर्वोत्तम अर्क घेण्यासाठी प्रवृत्त करतात. अगदी चार वेदांमधून संदर्भ घेतलेल्या आयुर्वेदामध्येही जवळपास ७५% मिश्रणांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कडुलिंबाचा वापर करण्यात आला आहे. बृहद् संहितेला भारतीय संस्कृतीचा एनसायक्लोपीडिया म्हणतात. या संहितेमध्येही वैद्यकीय उपयोगासाठी कडुलिंबाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

काही नोंदींनुसार कडुलिंबाचे तेल हे सर्वात प्राचीन ज्ञात वैद्यकीय तेल आहे.

कडुलिंब वेगळे का ठरते?

तुमच्यासाठी थोडीशी रोचक माहिती: कडुलिंबाच्या झाडाला इंडियन लैलाक म्हणतात हे तुम्हाला माहीत होते का? मानवाला ज्ञात झालेल्या पहिल्यावहिल्या झाडांमध्ये कडुलिंबाचा समावेश आहे. त्याला 'सर्व रोग निवारिणी' असेही म्हणतात. त्याचे खोड, तेल, पाने आणि फळ या सर्वांचा सुदृढ आयुष्य जगण्यासाठी उपयोग होतो. पारंपरिकरित्या कडुलिंबाला निसर्गाचे औषधालय म्हणतात.

कडुलिंबाच्या तेलाबद्दल थोडे बोलू या. या तेलाचा गंध इतर तेलांच्या तुलनेत थोडा उग्र असतो. पण त्याचे गुणधर्म मात्र एकमेवाद्वितीय आहेत. त्यामुळे हे तेल अष्टपैलू ठरते आणि त्यामुळेच याचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांपासून ते मॉस्किटो रिपेलंट्सपर्यंत सर्व प्रकारच्या उत्पादनांमध्ये करण्यात येतो.

कडुलिंबाच्या तेलामध्ये फॅटी अॅसिड्स आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात आणि त्यात काही त्वचास्नेही घटक आहेत जसे की:

  • ई जीवनसत्व
  • ट्रायग्लिसराइड्स
  • कॅल्शिअम
  • अँटिऑक्सिडंट

याच गुणधर्मांमुळे केवळ त्वचा सुंदर राखण्याबरोबरच एक्झेमा किंवा सोरायसिससारख्या विकारांवरही कडुलिंब गुणकारी ठरते. कडुलिंब आपल्या अँटिफंगल, अँटि-बॅक्टेरिअल, अँटिव्हायरल, कृमिनाशक, गर्भनिरोधक आणि शामक गुणधर्मांमुळे संसर्ग बरे करण्यासाठी ओळखला जातो.

संशोधनातून असेही दिसून आले आहे की, शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे स्काल्पवरील व्रण बरे करण्यासाठी कडुलिंबाचे तेल उपयोगी पडते. दीर्घकाळ वापरल्यास अॅक्ने बरे करण्यासही त्याचा उपयोग होतो.

कडुलिंबाचे तुम्ही अजून काय करू शकता?

कीडे घालविण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर करू शकतो. आजही घराच्या बाजूला कडुलिंबाचे झाड लावण्यास सांगितले जाते कारण त्यामुळे हवा ताजी, थंड राहते आणि कीडे येत नाहीत. हमामसारख्या महिलांच्या दैनंदिन सौंदर्यप्रसाधन उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो.

कडुलिंबाच्या शक्तीचा उपयोग

कडुलिंबाच्या औषधी उपयोगाचे अनेक पौराणिकसंदर्भही आहेत. कडुलिंबाचा वापर करून आपले पूर्वज निःसंकोच बाहेर फिरू शकायचे #GoSafeOutside. आजही हमाम सह कडुलिंबाच्या उपयोगाची ही परंपरा अशीच सुरू आहे.

तुम्ही कडुलिंबाच्या शक्तीचा पूर्ण वापर करत आहात का?

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top