Saturday, 24 Aug, 1.25 am Natural Beauty Secrets

Home
योग्य प्रकारे शॅम्पू करण्याच्या ६ पायऱ्या

शॅम्पू केसांना लावून ते हाताने घासणे म्हणजे शॅम्पू करणे असे तुमचे समीकरण आहे का? शॅम्पू केलेल्या केसांवर घाईघाईने पाणी ओतून तुम्ही ते टॉवेलने खसाखसा पुसून दिवसाची सुरुवात करता का? ज्या केशसंभाराला तुम्हाला तेल लावयाला, स्टाईल करायला आणि मिरवायला आवडते त्या केसांची काळजी घेताना मात्र दुर्लक्ष करता यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. तुमची केस धुण्याची पद्धत योग्य असेल याची खातरजमा करण्याच्या ६ टिप्स खालीलप्रमाणे.

१. ब्रश

अंघोळ करण्यापूर्वी केसांमधील गाठी आणि गुंता कंगव्याने सोडवा जेणेकरून रक्ताभिसरण वाढेल, छिद्रे मोकळी होतील आणि स्काल्पवर साचणारे तेल कमी होईल. केसाचा गुंता सोडवल्यामुळे शॅम्पू तुम्हाला एकसमानपणे केसांच्या टोकांपर्यंत लावता येईल.

२. केस धुणे

शॅम्पू लावण्यापूर्वी केस कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे केसांवरील मेणचट थर निघून जाईल आणि चिकट केसांवर साचलेले धुलिकण बाहेर पडतील. त्यामुळे कंडिशनरमधील तेल केस चांगल्या प्रकारे शोषून घेतील. तुमच्या नळातून येणारे पाणी जड असेल तर त्यातील क्षार शोषून घेणाऱ्या फिल्टरचा वापर करा. हलक्या पाण्याने केस अधिक चांगल्या प्रकारे धुतले जातात.

३. मसाज

शॅम्पू थेट केसांवर ओतू नका. हातावर थोडा शॅम्पू घ्या आणि तुमच्या स्काल्पला केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत हळुवारपणे मसाज करा. स्काल्पच्या प्रत्येक भागापासून ते मानेच्या व कानांच्या मागच्या भागापर्यंत पूर्ण भागाला तुम्ही शॅम्पू लावून मसाज करा. केसांच्या मुळांना अधिक शॅम्पूची गरज असते कारण त्याच ठिकाणी तेल जमा होत असते. केसांच्या टोकांना कमी शॅम्पूची आवश्यकता असते कारण केसांची टोके तुलेनेने कोरडी असतात.

४. पुनः केस धुणे

केसांना शॅम्पू लावल्यावर काही मिनिटे तो तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस नीट धुवा, जेणेकरून शॅम्पूचे अवशेष मागे राहू नये. लांब केस गार पाण्याने धुवावे. त्यामुळे नुकत्याच धुतलेल्या केसांवरील मेणचट थर नघून जातो आणि ताज्या धुतलेल्या केसांमध्ये मॉइस्चर टिकून राहते.

५. कंडिशन

शॅम्पू केलेल्या केसांमधून पाणी हळुवारपणे पण पूर्णपणे काढून टाका. तुमच्या केसांना साजेसा कंडिशनर वापरा. त्यासाठी केसांच्या मुळापासून टोकापर्यंत कंडिशनर लावा. स्काल्पला कंडिशनर लावू नका. थोडा वेळ कंडिशनर केसांमध्ये तसेच ठेवून द्या आणि गार पाण्याने धुवा. कंडिशनर केसांमध्ये राहणार नाही, याची काळजी घ्यावी. तसे झाल्यास केसांमध्ये अतिरिक्त तेल साचू शकते.

६. केस वाळवणे

केस शॅम्पू केल्यानंतर ते योग्य प्रकारे कोरडे करणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. केसांतून अतिरिक्त पाणी काढून टाकल्यावर तुमच्या केसांना टॉवेल गुंडाळा आणि काही वेळ तो तसाच ठेवा. रुंद कंगव्याने केसांमधील गुंता सोडवा. ओले केस नाजूक असतात, म्हणून फार जोरात कंगवा फिरवू नका. त्याचप्रमाणे केस वाळवतानाही टॉवेलने जोरात पुसू नका कारण तसे केल्याने आवश्यक तेल निघून जाते आणि केसांचा अधिक गुंता होतो. केस कोरडे करताना वर्तुळाकार टॉवेल फिरवून नका, खालच्या दिशेने टॉवेल फिरवून ओले गुंतलेले केस मोकळे होतील. केसांना नैसर्गिकपणे वाळू द्या. केस वाळवण्यासाठी ब्लो ड्रायरचा नियमित वापर टाळा. कारण त्यामुळेसुद्धा केसांमधून नैसर्गिक तेल काढून घेतले जाते.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक घटक असलेले सौम्य शॅम्पू वापरा, जेणेकरून दीर्घकालीन विचार करता केसांना अपाय होणार नाही. जे केस मरगळलेले किंवा रुक्ष असतात, त्यांच्यासाठी ऑलिव्ह व कॅमेलिया तेल समाविष्ट असलेला शॅम्पू वापरा. हा शॅम्पू त्या केसांचे पोषण करेल आणि त्यांना पुनरुज्जीवित करेल आणि केसांचे नुकसान भरून काढेल. रंग लावलेले किंवा केमिकल ट्रीटमेंट दिल्यामुळे गुंतलेल्या केसांना पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी कडुलिंब आणि जिनसेंग समाविष्ट असलेला शॅम्पू वापरा. तुमच्या केसांसाठी योग्य शॅम्पू जाणून घेण्यासाठी ट्रेसेमी बोटॅनिक रेंज जाणून घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Natural Beauty Secrets Marathi
Top