Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'या' मिळणार सुविधा
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार वित्तीय सहाय्य
  • अभ्यास दौरा खर्चासाठी किती रक्कम मिळणार ?
दिव्यांग विद्यांर्थ्यांना शिक्षणामध्ये सवलत प्राप्त करून देण्याकरीता शासन नेहमी प्रयत्न करत असते.
यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षणासाठी पाठबळ मिळावे, याकरीता शासनाने शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. 12 वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पहिल्यांदाच वाढ झाली असून ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार प़डली.

CSE की AI & Data Science; इंजिनिअरिंग प्रवेशापूर्वी 'हा' फरक जाणून घ्या, करिअरसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'या' मिळणार सुविधा

उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. या सुधारित योजनेअंतर्गत विद्यापीठ, संस्था, शिक्षण मंडळाला भरावे लागणारे शुल्क तसेच प्रवेश फी, ट्युशन फी, नोंदणी शुल्क, खेळ, लायब्ररी, मॅगझिन आणि वैद्यकीय तपासणी यासारखे इतर भराव्या लागणाऱ्या सक्तीच्या शुल्काकरिता रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. तसेच या शुल्काव्यतिरिक्त खालीलप्रमाने वित्तीय सहाय्य केले जाणार आहे .

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारे वित्तीय सहाय्य

  • पदवी व पदव्युत्तर तसेच पदव्युत्तर डिप्लोमा करणाऱ्या निवासी विद्यार्थ्यास १७०० रु अनिवासी विद्यार्थ्यास ९०० रु दिले जाणार आहेत.
  • इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी असलेल्या निवासी विद्यार्थ्यास १२०० रु तर अनिवासी विद्यार्थ्यास ८५० रु दिले जातील.
  • दोन्ही गटात समाविष्ट नसलेल्या पदवी आणि पदव्यत्तरचे शिक्षण घेत असलेल्या निवासी विद्यार्थ्यास १२०० रु तर अनिवासीसाठी ८५० रु मिळतील.
  • दहावीनंतर पदवीतर डिप्लोमांसाठी निवासी विद्यार्थ्यास ११०० रु तर अनिवासीसाठी ८०० रु वित्तीय सहाय्यता दिली जाणार आहे.
  • अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता हा २२५ रु ते ३०० रु दरम्यान मिळेल.
Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम मिळणार

अभ्यास दौरा खर्चासाठी वार्षिक १५०० रुपये तर प्रकल्प टंकलेखन (थेसिस टायपिंग) व छपाई खर्च तसेच पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणासाठी प्रकल्प टंकलेखन (थेसिस टायपिंग) व छपाई खर्च व पुस्तकसाठी भत्ता १८०० रुपये करण्यात आला आहे. प्रकल्प, टंकलेखन, छपाई व पत्रव्यवहार आणि पुस्तकासाठी म्हणून आता १८०० रु देण्यात येणार आहेत. तसेच शिक्षण शुल्काची असणारी संपूर्ण रक्कम मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra