Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता; अनेक मुद्यांवरून विरोधक करणार सरकारला लक्ष्य

20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता; अनेक मुद्यांवरून विरोधक करणार सरकारला लक्ष्य

वी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन२० जुलैपासून सुरू होण्याची शक्यता असून, ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालू राहू शकते. विरोधी पक्ष या अधिवेशनासाठी आपली रणनीती आखत असताना, केंद्र सरकारनेही संभाव्य मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया देण्याची आणि विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे.

गरज पडल्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संसदेतील विरोधी पक्षाची सूत्रे हाती घेऊ शकतात.

पंतप्रधान मोदी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याबद्दल ते विरोधी पक्षावर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार या अधिवेशनात एक घटनादुरुस्ती विधेयक आणू शकते, ज्यामुळे खासदार, आमदार, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना तुरुंगवास झाल्यास त्यांच्या पदावरून दूर केले जाईल. याशिवाय, संसदेतील दोन-तृतीयांश खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास, सरकार महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा सादर करू शकते.

'एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल'; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला

अयोध्या येथील कथित निधी चोरीच्या प्रकरणावरून विरोधी पक्ष प्रामुख्याने भाजपला लक्ष्य करतील. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, ही चोरी नसून दरोडा आहे. या दरोड्यामागे कोण आहे, हे उघड करणे हा खरा मुद्दा आहे. भाजप अशा लहान नोकर आणि कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवून या मुद्द्यावर जनतेची फसवणूक करणार आहे, की खरा सूत्रधार कोण आहे हे उघड करणार आहे? असा सवाल उपस्थित केला.

फाईव्ह स्टार ऑफिससाठी पैसा आला कुठून?

भाजप देशभरात जी पंचतारांकित कार्यालये बांधत आहे, त्यासाठी पैसा कुठून आला, हे देखील उघड केले पाहिजे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव म्हणाले की, अयोध्येतील देणग्या चोरून भाजपने देवाचीही चोरी केली आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले की, नीट पेपरफुटी आणि ओएसएम सीबीएसईमुळे शेकडो विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

'ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही'; ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार? शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचे मोठे विधान

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra