- पोकोने भारतात पोको एम8 पावर 5G स्मार्टफोन 8,000mAh बॅटरी आणि 120Hz अमोलेड डिस्प्लेसह लॉन्च केला आहे.
- या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये असून पहिली विक्री 7 ऑगस्ट रोजी फ्लिपकार्टवर होणार आहे.
- फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट, 50MP कॅमेरा आणि अँड्रॉईड 16 आधारित हायपरओएस 3 देण्यात आला आहे.
पोको एम8 पावर ची किंमत आणि उपलब्धता
कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 6GB/128GB आणि 8GB/128GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6GB/128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB/128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 3 हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर्स देखील देणार आहे. फोनची पहिली विक्री 7 ऑगस्ट 2026, रोजी फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य: flipkart)
पोको एम8 पावरचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.9-इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1,800 निट्सपर्यंत जाऊ शकते. अंधारात डोळ्यांवर ताण येऊ नये, यासाठी या डिव्हाईसमध्ये 960Hz PWM डिमिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. फोनची स्क्रीन संपूर्ण DCI-P3 कलर रेंजला कव्हर करते. डिव्हाईसमध्ये वरच्या बाजूला गोरिल्ला ग्लास 7i मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग दिली आहे.
चिपसेट
स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे. ज्यासोबत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 2.2 स्टोरेज मिळणार आहे.
बॅटरी
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 8,000 बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनची बॅटरी 45W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि दुसऱ्या गॅझेट्सना 22.5W वर रिवर्स-चार्ज देखील करू शकते.
गेमिंगचा खर्च वाढला! Sony ने अचानक वाढवली PS5 ची किंमत, आता मोजावे लागणार अधिक पैसे
कॅमेरा
स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. दोन्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तुम्ही 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकता. स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर चालतो. फोनमध्ये 4 वर्षांसाठी ओएस अपडेट आणि 6 वर्षांसाठी सिक्योरिटी पॅच देण्यात आला आहे.

