Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आधीच पराभव अन् आता MI समोर उभे ठाकले संकट! Rohit Sharma आउट? प्रकरण काय?

आधीच पराभव अन् आता MI समोर उभे ठाकले संकट! Rohit Sharma आउट? प्रकरण काय?

उद्या मुंबई विरुद्ध पंजाबमध्ये रंगणार सामना वानखेडे स्टेडियमवर येणार आमनेसामने
रोहित शर्मा न खेळण्याची शक्यता

Tata IPL 2026 Mumbai Indians Vs PBKS: आयपीएलच्या हंगामातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

उद्या होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जच्या सामन्यात रोहित शर्माखेळणार नसल्याचे समजते आहे. हा सामना उद्या संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्ज जबरदस्त फॉर्ममध्ये असून, मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र आता मुंबईच्या संघाची चिंता वाढली आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. सलग तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे. त्यातच आता उद्या होणाऱ्या पांजब किंग्जविरुद्ध प्रमुख खेळाडू असलेला रोहित शर्मा खेळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संघाच्या आणि चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

12 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना झाला. आरसीबीने हा सामना जिंकला. या सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. स्नायूच्या दुखापतीमुळे तो रिटायर हर्ट झाला. त्यानंतर तो फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात आला नाही. या घटनेनंतर त्याला स्कॅन करण्याचा सल्ला देण्यात आला होता, ज्यामध्ये सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे.

Ro-Hit Man 'ऑन फायर'; Mumbai Indians साठी केला 'हा' 'विराट' विक्रम, व्हाल थक्क

दुखापत झाल्यामुळे रोहित शर्माने सराव सत्रात देखील सहभाग घेतला नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तो उद्याचा सामना खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रोहीत शर्मा न खेळल्यास सलामीला खेळण्यासाठी कोण येणार की संघात आणखी एक गोलंदाज खेळवला जाणार हे पहावे लागणार आहे.

Ro-Hit Man 'ऑन फायर'

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (IPL 2026) यांच्यात सामना पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करून 240 रन्स केल्या. मुंबईची फलंदाजी 241 रन्सचा पाठलाग करताना ढेपाळली. 18 रन्सने मुंबई पलटणचा पराभव झाला. मात्र रोहित शर्माने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कॅप्टन्सी की नौटंकी? Hardik Pandya पुन्हा टार्गेटवर; माजी खेळाडूने थेट 'इज्जत'च काढली

मुंबई इंडियन्सकडून खेळताना भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्यान मुंबईकडून खेळताना 6 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. मुंबई इंडियन्ससाठी 6 हजार रन्स करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यामुळे रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra