Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

आधुनिक उपकरणांद्वारे वृक्षगणना! मुंबईत लोकसहभाग वाढण्यासाठी पालिकेचे प्रशिक्षण शिबिरांवर भर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत यावर्षी मुंबई शहरातील वृक्षगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम ‘सार आयटी रिसोर्सेस’ या खाजगी कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील प्रत्येक वृक्षाची नोंद केवळ कागदोपत्री न राहता, आधुनिक उपकरणांच्या आणि विशेष मोबाईल ॲपच्या सहाय्याने शाखीय पद्धतीने घेतली जाणार आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात लोकसहभाग वाढवण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. या गणनेत जास्तीत जास्त वृक्षप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी आणि महापालिकेच्या उद्यान विभागासह इतर विभागांतील अधिकारी सहभागी व्हावेत, असा पालिकेचा प्रयत्न आहे.(फोटो सौजन्य - AI)

डीआरपी सीईओंची डीबीए शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा; 'अनिर्णित पात्रते'बाबत सेक्टरनिहाय शिबिरे आयोजित केली जाणार

शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचे पाऊल

या मोहिमेबाबत मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी म्हणाले की: वृक्षगणना हे शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, तरी आपल्या सोसायटीमध्ये किंवा खाजगी मालमतेमध्ये जेव्हा प्रगणक वृक्षांची माहिती घेण्यासाठी येतील,तेव्हा त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या शास्त्रीय गणनेमुळे मुंबईतील हरित संपतीचा नेमका आकडा आणि स्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

व्यापक उपक्रम राबविण्यावर पालिका प्रशासनाचा भर

याचाच एक भाग म्हणून नुकतेच ‘वीरमाता जिजाबाई भोसले’ (राणी बाग) येथे एका विशेष प्रशिक्षण सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराला विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शवला.तज्ज्ञामार्फत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

Mumbai News: कूपरमध्ये जैविक कचऱ्याचा खच! मनुष्यबळ, कंत्राटी वादांचा फटका थेट आरोग्य व्यवस्थेला

या प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी पालिकेने विविध महाविद्यालयामध्येही शिबिरे सुरू केली आहेत. नुकतेच घाटकोपर येथील ‘राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज’ येथे अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, या शिबिरामध्ये वृक्षांची प्रजाती ओळखणे, त्याचे वय निश्चित करणे, वृक्षांच्या आरोग्याचा अभ्यास करणे आणि गणनेसाठी वापरली जाणारी आधुनिक तांत्रिक उपकरणे व मोबाईल अॅप कशी वापरावीत, याचे सखील मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात आले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra