Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आई शेवटी आईच असते! दलदलीत अडकून पिल्लाचा मृत्यू, तासनतास त्याला बिलगून राहिली हत्तीण, मन हेलावून टाकाणारा Video Viral

आई शेवटी आईच असते! दलदलीत अडकून पिल्लाचा मृत्यू, तासनतास त्याला बिलगून राहिली हत्तीण, मन हेलावून टाकाणारा Video Viral

  • जंगलातील एका हृदयद्रावक घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
  • मदतीची वाट पाहत एका आईची तासनतास सुरू असलेली धडपड पाहून लोक भावूक झाले.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेनंतर वन विभागाच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाढत्या शहरीकरणामुळे प्राण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. यात कुठेतरी चूक माणसांचीच आहे हे नाकराता येत नाही. जंगले कमी होत गेली आणि त्याचबरोबर प्राण्यांचे प्रमाण देखील कमी होत गेले. वन्यजीवांचे रक्षण करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ते निसर्गाचा एक अमूल्य ठेवा आहेत ज्यांचे जतन होणे अनिवार्य ठरते. अनेकदा सोयीसुविधांच्या अभावामुळे प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागते.

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! जंगलात फिरताना दिसला पांढरा हरीण, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

अशीच काहीशी घटना अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यातून चिमुकल्या हत्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याचा हा मृत्यू दलदलीत अडकल्याने झाला. व्हिडिओतील सर्वात हेलावून टाकणारी गोष्ट ठरली ती पिल्लाच्या आईची प्रतिक्रिया. आपल्या मुलाचा मृत्यू स्वत:च्या डोळ्यांनी पाहावं याहून मोठं दु:ख नाही, कोणत्याही आईसाठी ही भावना मनाला वेदना देणारी ठरते. आपला मुलगा आता या जगात नाही ही गोष्ट हत्तीणीला काही केल्या पटत नव्हती ज्यामुळे ती त्याच्या प्रतिक्षेत तासनतास दलदलीत उभी राहिली. या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर सर्वांनाच भावूक करत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हत्तींचा एक गट रायगडच्या धर्मजयगड वनविभागातील अमामुडा तलावात आंघोळीसाठी आला होता. परंतु याचवेळी हत्तींमधील एक चिमुकलं बाळ तलावाच्या दलदलीत वाईटरित्या अडकतो. तो स्वत:ला त्यातून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करतो पण यात तो अपयशी ठरतो. सांगितलं जातंय की, रात्रभर सर्व हत्ती मदतीसाठी आवाज देत होते पण कुठुनही मदतीचा हात पुढे आला नाही शेवटी हत्तीच्या पिल्लाचा त्या दलदलीतच मृत्यू झाला.

तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि हवेतच अडकला बकऱ्याचा जीव, प्राण्याचा आक्रोश अन् Rescue Video Viral

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हत्तीण आपल्या पिल्लाला दलदलीत बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसते. पिल्लूची हालचाल बंद झालेली असते पण त्याची आई मात्र त्याला वाचवण्यासाठी निरंतर प्रयत्न करताना दिसते. व्हिडिओतील या दृष्यांनी आता सर्वांनाच भावूक केलं आहे. सांगितलं जात आहे की, गेल्या १७ दिवसांत या परिसरात हत्तीच्या तिसऱ्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक मृत्यू हे पाण्यात बुडून किंवा दलदलीत अडकूनच झालेत. वन विभागाने आता या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra