बीड : बीड जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या विलास घुले हत्या प्रकरणावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलआणि आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी काही नेत्यांचा एकेरी उल्लेख करत आक्रमक भूमिका मांडली.
वाघमारे यांनी आरोप केला की, विलास घुले हत्या प्रकरण दडपण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत आहेत. त्यांनी खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांच्यावरही निशाणा साधला.
या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असताना, "एसआयटीमध्ये काहीच सापडले नाही हे मनोज जरांगे पाटील यांना कसे काय माहिती"transliteration">यावेळीटीकाकरतानात्यांचीजीभघसरलीआणित्यांनीमनोजजरंगेपाटलांचाउल्लेखमन्याअसाकेला. तर, आमदारसुरेशधसयांच्यावरटीकाकरतानात्यांनी ‘आष्टीचा जब्या‘ म्हणतत्यांचीखिल्लीउडवली.
'राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं'; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
दरम्यान, याप्रकरणावरूनवातावरणतापलेलेअसतानाचवाघमारेहेयाबाबतथेट मुख्यमंत्री फडणवीसांकडेयाबाबततक्रारकरणारआहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची सर्व माहिती देणार आहोत, असेही वाघमारे यांनी सांगितले.
याप्रकरणातखासदारबजरंगसोनावणेयांच्यामुलाचेनावयाप्रकरणातआल्यानेमोठाराजकीयवादंगनिर्माणझालाआहे. हे हत्या प्रकरण दडपण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत असल्याचाआरोपवाघमारेंनीकेलाअसून त्यांनी खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांच्यावरही निशाणा साधला.
ओबीसी समाज आक्रमक
विलास घुले हत्या प्रकरणानंतर ओबीसी समाज अधिक आक्रमक होताना दिसत आहे. विविध ओबीसी संघटनांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली जात आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी देखील या प्रकरणावर आपापली बाजू मांडताना दिसत आहेत.

