Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार

आता इज्जतीचा प्रश्न! Vaibhav वर अन्याय करणाऱ्या Shreyas समोर विजयाचे आव्हान; IND Vs ENG सामना कुठे पाहता येणार

  • उद्या होणार भारत – इंग्लंड दुसरा सामना
  • संध्याकाळी 7 वाजता दोन्ही संघ उतरणार मैदानात
  • संजू सॅमसनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
India Vs England T20 Series: भारत अन् इंग्लंडमधील टी 20 सिरिजमधील दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
हॅरी ब्रूक इंग्लंडचे तर श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र आता उद्या दूसरा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान संजू सॅमसनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. उद्याचा सामना कुठे पाहता येईल आणि किती वाजता सुरू होणार आहे हे जाणून घेऊयात.

भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र दुसऱ्या सामन्यात देखील गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरकडून वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. आयर्लंडविरुद्धचे 2 सामने आणि इंग्लंडविरुद्धचा 1 सामना संजू सॅमसन अपयशी ठरला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात वैभवला स्थान मिळेल, त्याला डेब्यू करण्याची संधी दिली जाईल असे म्हटले जात होते. मात्र वैभवला अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून त्याला एकही सामना जिंकता आलेला नाहीये. आयर्लंडने प्रथमच भारताला 2-0 ने हरवले आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे उद्याचा सामना जिंकण्यासाठी श्रेयस अय्यर आणि भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. मात्र वैभव सूर्यवंशीला भारतीय मॅनेजमेंट डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.

IND vs ENG: संजू सॅमसनला शेवटची संधी, दुसऱ्या सामन्याही खेळणार नाही Vaibhav Sooryavanshi; कशी असणार Playing 11?

कधी आणि कुठे पाहता येणार लाईव्ह सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांमधील दुसरा टी 20 सामना उद्या खेळवला जाणार आहे. हा सामना उद्या संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी 6.30 वाजता टॉस होणार आहे. हा सामना तुम्ही मोबाइलवर जिओ हॉटस्टारवर पाहू शकणार आहात. तसेच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकणार आहात.

IND vs ENG: सामना पावसामुळे रद्द, पण जोस बटलरने रचला इतिहास; धोनी-गिलख्रिस्टला मागे टाकत केला 'महाविक्रम'

भारतीय संघ: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra