Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आठवडाभरात चेहऱ्यावरील डाग होतील कायमचे गायब! कच्च्या दुधाचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो

आठवडाभरात चेहऱ्यावरील डाग होतील कायमचे गायब! कच्च्या दुधाचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो

कामाच्या धावपळीमधून त्वचेचीकाळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. कायमच त्वचेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे पिंपल्स, काळे डाग आणि त्वचेच्या इतर समस्या सुद्धा वाढू लागतात. त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

यामुळे चेहरा पूर्णपणे निस्तेज होतो. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या फेस सीरम किंवा फेस मास्कचा वापर केला जातो. पण यामुळे काहीकाळ त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालांतराने त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे वारंवार चेहऱ्यावर केमिकल प्रॉडक्ट किंवा क्रीम लावू नये. यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला कच्च्या दुधाचा वापर करून फेशिअल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य - istock)

वातावरणातील बदलांमुळे केस खूप पातळ झाले आहेत? मग टक्कल पडण्याआधी केसांवर लावा 'या' पदार्थाचे पाणी, केस होतील मजबूत

मिल्क फेशिअल करण्याची सोपी पद्धत:

कच्च्या दुधाचा वापर केल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करू नये. मिल्क फेशिअल करण्यासाठी सर्वप्रथम, त्वचा क्लिंझिंग करणे फार आवश्यक आहे. यासाठी फ्रिजमध्ये ठेवलेले थंडगार दूध घ्यावे. त्यानंतर दुधात हळद मिक्स करून घ्या. कॉटनच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर तयार केलेले मिल्क लावून त्वचेवर लावा आणि त्वचा व्यवस्थित स्वच्छ करा. हळद आणि दूध त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते.

दुसऱ्या स्टेपमध्ये त्वचा स्क्रबिंग करून घ्यावी. चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि डेड स्किन घालवण्यासाठी स्क्रब करणे फार आवश्यक आहे. यासाठी वाटीमध्ये कच्चे दूध आणि तांदळाचे पीठ एकत्र मिक्स करून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि हातांना पाणी लावून हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

वयाच्या पन्नशीत चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस सीरम

तिसऱ्या स्टेपमध्ये त्वचेला ५ ते ७ मिनिटे मसाज द्यावा. यामुळे त्वचेवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. यासाठी कोरफड जेल आणि कच्चे दूध एकत्र मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर चौथ्या स्टेपला फेसपॅक लावावा. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, बेसन आणि गव्हाचं पीठ एकत्र करून त्यात कच्चे दूध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून ठेवा आणि थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. फेसपॅक लावून त्वचा स्वच्छ केल्यानंतर मॉईश्चराईज लावणे फार आवश्यक आहे. यामुळे त्वचेमध्ये बदल दिसून येईल.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra