Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhijeet Dipke: टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली? अभिजीत दिपकेंच्या घरी डॉक्टरांचं पथक दाखल; नेमकं काय झालं?

Abhijeet Dipke: टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली? अभिजीत दिपकेंच्या घरी डॉक्टरांचं पथक दाखल; नेमकं काय झालं?

  • CJP संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली
  • डॉक्टरांकडून तपासणी सुरू
  • टायफॉईडनंतर पुन्हा प्रकृती खालावली?

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती शनिवारी (1 ऑगस्ट) अचानक बिघडली.

दिल्लीतील आंदोलन संपवून महाराष्ट्रात परतल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील घरी नागरिक आणि समर्थकांची भेट घेत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उलटी झाली असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत आहे.

लोकांना भेटत असताना प्रकृती खालावली

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे 11.45 वाजता अभिजीत दिपके आपल्या घराच्या पार्किंगमध्ये समर्थकांना भेटण्यासाठी आले होते. भेटीदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ते घराच्या मागील बाजूस गेले, जिथे त्यांना उलटी झाली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद न साधता घरात विश्रांती घेतली.

वडिलांनी दिली माहिती…

या घटनेची पुष्टी करताना अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत.

'राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही'; मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा, 'काही लोक त्यांना बळजबरीने…'

दिल्ली आंदोलनानंतर महाराष्ट्रात पुनरागमन

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 29 जुलै रोजी अभिजीत दिपके महाराष्ट्रात परतले होते. सुमारे 40 दिवसांच्या आंदोलनानंतर घरी परतलेल्या दिपके यांचे विमानतळावर कुटुंबीय आणि समर्थकांनी भावनिक स्वागत केले होते. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना मिठी मारत स्वागत केले होते.

यापूर्वी झाला होता टायफॉईड

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान 25 जुलै रोजी अभिजीत दिपके यांनी स्वतःला टायफॉईड झाल्याची माहिती दिली होती. काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसून उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. तरीही त्यांनी आंदोलनात सहभाग कायम ठेवला होता.

अभिजीत दिपके कोण?

अवघ्या 30 वर्षीय अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली आहे. देशातील Gen Z पिढीच्या आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळे ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. अलीकडेच त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत त्यांचे आभारही मानले होते.

'दिपकेंची जात आडवी आली का?' तिरंगा रॅलीवरून गुणरत्न सदावर्तेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra