Dailyhunt
अभिनेता Bhushan Pradhan लवकरच अडकणार लग्नबंधनात; फोटो शेअर करत जाहीर केली लग्नाची तारीख, पाहा Photo

अभिनेता Bhushan Pradhan लवकरच अडकणार लग्नबंधनात; फोटो शेअर करत जाहीर केली लग्नाची तारीख, पाहा Photo

भूषण प्रधान हा मराठी आणि नाटक क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. भूषणने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तो झळकला आहे. मराठीतील हँडसम चॉकलेट बॉय म्हणून अभिनेत्याकडे पाहिलं जातं.भूषण प्रधान हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून तो नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

तो नेहमी त्याच्या आयुष्यातील अपडेट्स हा चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतीच भूषणने एक पोस्ट केली आहे.

यात त्याने त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्या होणाऱ्या पार्टनरचा चेहरा दिसत नाही. या फोटोमध्ये या दोघांच्या हातात अंगठी दिसत आहे. या फोटोने त्याने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Asha Bhosle Funeral: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अखेरचा निरोप

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने त्याच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. 24.07.2026 असं कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे. हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भूषण प्रधानच्या पोस्टमध्ये जरी तिचा चेहरा दिसत नसला तरी हि अभेनत्री Anusha Dandekar असल्याची कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

या फोटोमध्ये भूषणने २७ जुलै २०२६ ही तारीख दिली असून त्याखाली त्याने लिहिलंय, 'आमच्या नव्या सुरूवातीचे साक्षीदार व्हा!' भूषणने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून कलाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आशाताईंच्या स्मृतींना शासन मानवंदना देणार! मुंबईत उभारणार जागतिक दर्जाची संगीत संस्था; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra