Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं! ट्रॅव्हल्स-दुचाकीची समोरासमोर धडक, 4 तरुणांचा जागीच मृत्यू; ओळख पटवणंही कठीण

Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं! ट्रॅव्हल्स-दुचाकीची समोरासमोर धडक, 4 तरुणांचा जागीच मृत्यू; ओळख पटवणंही कठीण

  • ट्रॅव्हल्सच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू.
  • अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर; मृतदेहांची अवस्था विदारक.
  • मानवत शहरात शोककळा; पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
परभणी: परभणी- पाथरी महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. परभणीहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीने ४ तरुण प्रवास करत होते. ट्रॅव्हल्सच्या धडकेने या चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे.

कसा झाला अपघात?

ट्रॅव्हल्स (क्रमांक NL 01 B 1374) ही परभणीहून पुण्याकडे जात होती. मानवतच्या राहुल जिनिंगसमोर समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक MH 22 BB 4724) ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोर दार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील चारही तरुणांचा मृत्यू झाला. दुचाकी चक्काचूर झाली. अपघाताचा मोठा आवाज ऐकू आला. यामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, मृतदेहांची अवस्था अत्यंत विदारक झाली होती. पोलिसांना मृतांची ओळख पटविणे सुरुवातीला कठीण झाले होते. त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात हलवले तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या प्रकरणी मानवत पोलीस पुढील तपास करत आहेत.

राज्याच्या सीमेजवळील भयकंर घटना! जमिनीच्या वादातून ६ जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; संपूर्ण परिसर हादरला

मृत्यू झालेल्यांची नावे

शुभम आप्पाराव दहे (वय 30), विष्णू गोरे (वय 28), प्रल्हाद अशोकराव कुटे (वय 29) आणि नवनाथ शामराव जाधव (वय 38, सर्व रा. मानवत) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. एकाच वेळी मानवत येथील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

राज्याच्या सीमेजवळील भयकंर घटना! जमिनीच्या वादातून ६ जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; संपूर्ण परिसर हादरला

विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गाव शुक्रवारी सायंकाळी अचानक गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेले आणि काही क्षणांतच सहा निष्पाप जीव रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. जमिनीच्या जुन्या वादातून घडलेल्या या भीषण सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण भिमातीर परिसर हादरून गेला असून गावात भीती, तणाव आणि हळहळ व्यक्त होत आहे.

गोविंदपूर येथील निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटण्याऐवजी अधिक चिघळत गेला आणि अखेर शुक्रवारी त्याचे रूप थेट रक्तरंजित संघर्षात बदलले. सायंकाळच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोर गावात दाखल झाले आणि त्यांनी थेट अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गावात एकच गोंधळ उडाला. नागरिक जीव वाचवण्यासाठी घरांकडे धावू लागले.

Solapur News : बार्शीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; रोख रकमेसह 2 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra