मुंबई
Accident | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

डहाणूतील धानीवरी येथे इको कारचा अपघात झाला. परंतु या अपघातात मायलेकाचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. जखमी प्रवाश्याला तात्काळ कासा उपजिल्हा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रूग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत.
मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) भीषण( Accident) अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (शनिवार) दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये डहाणूतील धानीवरी येथे इको कारचा अपघात झाला. परंतु या अपघातात मायलेकाचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. जखमी प्रवाश्याला तात्काळ कासा उपजिल्हा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रूग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत.
हे सुद्धा वाचा
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून गुजरातकडे लग्नासाठी जाणाऱ्या इको कारचा अपघात झाला. परंतु हा अपघात नेमका कशामुळे झाला ? हे अद्याप अस्पष्ट आहे.