Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अडचणीच अडचणी! भारताविरुद्ध England उतरवणार 'हा' युवा खेळाडू; रेकॉर्ड वाचून बसेल धक्का

अडचणीच अडचणी! भारताविरुद्ध England उतरवणार 'हा' युवा खेळाडू; रेकॉर्ड वाचून बसेल धक्का

  • भारत अन् इंग्लंड खेळणार 3 वनडे सामने
  • इंग्लंडने भारताविरुद्ध जाहीर केला संघ
  • 14 जुलै पासून रंगणार वनडेचा थरार
India Vs England ODI Series: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे.
दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिका सुरू होईल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात जेम्स कोल्स या युवा खेळाडूला देखील संधी देण्यात आली आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या जेम्स कोल्सला इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय संघात स्थान दिले आहे. जेम्स कोल्सने आपली गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. जेम्स कोल्स फिरकीपटू आहे. जेम्स कोल्सने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे.

जेम्स कोल्सने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 3441 रन्स केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 9 शतके लगावली आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत देखील सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 74 विकेट्स प्राप्त केल्या आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीत जेम्स कोल्सने शानदार कामगिरी केली आहे.

IND vs ENG ODI Series: जो रूटचे कमबॅक, फिल सॉल्टला डच्चू! भारताविरुद्धच्या वनडेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; हॅरी ब्रूककडे कर्णधारपद

जेम्स कोल्सने 16 व्या वर्षीच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने 16 व्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2020 मध्ये त्याने बॉब विलिस ट्रॉफीकडून डेब्यू केले होते. त्यानंतर त्याला आता थेट भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे.

भारताविरुद्धच्या वनडेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने या एकदिवसीय मालिकेसाठी हॅरी ब्रूकला संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्त केले आहे. अनुभवी फलंदाज जो रूटचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर फिल सॉल्ट संघात देण्यात आलेले नाही. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेसाठी १६ खेळाडूंची निवड केली आहे.

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ:
इंग्लंड : हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, जो रूट, जोश टंग.

भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेट कीपर), वॉश्गिंटन सुंदर, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra