Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

  • सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका गोंडस प्राण्याच्या फोटोने यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • त्याच्या वेगळ्या रूपामुळे अनेकजण फोटो खरा आहे की एआयने तयार केला आहे याबाबत चर्चा करत आहेत.
  • इंटरनेटवर या फोटोवर मजेशीर आणि प्रेमळ प्रतिक्रिया देत नेटिझन्सनी कमेंट सेक्शन गाजवला आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज तुम्हाला असंख्य मनोरंजक व्हिडिओज पाहायला मिळतात. तुम्ही सोशल मिडियावर एक्टिव्ह असल्यास हे व्हायरलव्हिडिओज तुम्ही नक्कीच पाहिले असतील. इथे कधी धोकादायक स्टंट्स शेअर केले जातात, कधी धक्कादायक अपघातांचे दृष्य, कधी भावूक करणारे व्हिडिओज तर कधी असे व्हिडिओज शेअर केले जातात जे चेहऱ्यावर निखळ हसू आणतात. इथे फक्त माणसांचेच नाही तर काही प्राण्यांचेही रंजक व्हिडिओज शेअर केले जातात जे पाहून आपल्याला प्राण्यांविषयी आणखी जवळून जाणून घेता येते.

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

आताही एक असेच दृष्य इथे शेअर करण्यात आले आहे ज्यात हत्तीचे एक गोंडस गुबगुबीत बाळ दिसून आले. हत्तीच्या पिल्लाला तर आपण अनेकदा पाहिले असेल पण व्हिडिओतील पिल्लाचे रुप काही निराळेच होते. त्याचे गुबगुबीत रुप इतके गोड दिसत होते की पाहूनच यूजर्स त्याच्यावर रुपावर घायाळ झाले. चला सविस्तर जाणून घेऊया.

आपण आजवर हत्तीच्या चिमुकल्या पिल्लाला पाहिलं असेल पण त्याचं गुबगुबीत रुप मात्र पहिल्यांदाच व्हायरल फोटोत पाहायला मिळाले. लहान पाय, लहान हात, इवले डोळे, मोठे कान आणि लक्षवेधी ठरलेले त्याचे गुबगुबीत शरीर! इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या पिल्लाच्या या फोटोने यूजर्सना भारीच खुश केलं आहे. कुणी त्याच्या रुपाचे काैतुक करत आहे तर कुणी हा फोटा खरा की एआयने बनवलेला या खात्री करु पाहत आहे. आता हा फोटो खरा की खोटा हे तर अद्याप स्पष्ट झालं नाही पण फोटोने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं इतकं नक्की.

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

दरम्यान हत्तीच्या पिल्लाचा हा फोटो @sweetdecember09 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. फोटो चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने याच्या कमेंट सेक्शनमध्ये पिल्लाच्या सुंदर रुपावर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, "तो फारच गोड आहे", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "हा तर खरोखरचा जंबो आबे" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "पहिल्यांदाच दुप्पट जाड हत्ती पाहिला".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra