Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
AITechnology: 'AI तंत्रज्ञान लीक झालं तर.' चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?

AITechnology: 'AI तंत्रज्ञान लीक झालं तर.' चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?

  • अमेरिकेप्रमाणेच चीननेही अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाला आपली ‘राष्ट्रीय संपत्ती’ मानत त्यावर कडक नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे.
  • अलीबाबा आणि बाइटडान्ससारख्या दिग्गज कंपन्यांसोबत गुप्त बैठका घेऊन प्रगत एआय मॉडेल्स देशाबाहेर लीक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत एआय तंत्रज्ञानाची गळती किंवा चोरी हा थेट फौजदारी गुन्हा ठरवून कठोर शिक्षेची तरतूद केली जात आहे.

Artificial Intelligence China: अमेरिकेसोबतच्या वाढत्या तांत्रिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, चीनने आपले प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वाचवण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अत्याधुनिक एआय मॉडेल्स ही देशाची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय संपत्ती असल्याचे मानत, चिनी अधिकाऱ्यांनी देशांतर्गत तंत्रज्ञान कंपन्यांना हे प्रगत तंत्रज्ञान कोणत्याही परिस्थितीत देशाबाहेर लीक होऊ न देण्याचा गंभीर इशारा दिला आहे.

टेक दिग्गजांसोबत बीजिंगमध्ये गुप्त बैठका

रॉयटर्सच्या अहवालानुसार, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आणि राष्ट्रीय विकास व सुधारणा आयोगाने अलीबाबा, बाइटडान्स आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या ‘Z.ai’ सारख्या आघाडीच्या स्टार्टअप्ससोबत अनेक गुप्त बैठका घेतल्या आहेत. या बैठकांचा मुख्य उद्देश चीनचे सर्वात प्रगत एआय मॉडेल्स (क्लोज्ड-सोर्स आणि ओपन-सोर्स दोन्ही) देशांतर्गतच मर्यादित ठेवणे हा होता. अलीबाबाचे ‘क्वेन’ (Qwen) आणि बाइटडान्सचे ‘डौबाओ’ (Doubao) हे चीनमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्स आहेत, तर Z.ai चे ‘GLM-5.2’ मॉडेल कमी खर्चात अमेरिकेच्या सर्वोत्तम एआय मॉडेल्सना थेट टक्कर देत आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान परदेशात जाऊ नये म्हणून चीन प्रयत्नशील आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chikkaballapur: एका गर्भवती महिलेचा मृत्यू अन्… जाणून घ्या भारताच्या 'या' गावावर का होतं इराणच्या सर्वोच्च नेत्याचं छत्र?

एआय चोरीसाठी थेट फौजदारी गुन्हा आणि कठोर शिक्षा

चीनच्या कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत मालकी हक्काच्या एआय तंत्रज्ञानाची कोणतीही गळती किंवा चोरी हा थेट फौजदारी गुन्हा मानला जावा, अशी तयारी बीजिंग करत आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक एआय स्टार्टअप्सना परदेशातून मिळणाऱ्या निधीवरही नवीन निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, मेटा (Meta) कंपनीकडून चिनी एआय स्टार्टअप ‘मानुस’ (Manus) चे होणारे २ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण चीनने सुरक्षेचे कारण देत रोखले होते.

जागतिक बाजारपेठेवर होणार परिणाम: चीनच्या या अंतर्गत निर्बंधांमुळे जागतिक एआय बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. चिनी एआय मॉडेल्स त्यांच्या कमी किमतीमुळे जगभरात लोकप्रिय होत आहेत, पण बीजिंगने यावर निर्बंध आणल्यास अनेक आंतरराष्ट्रीय व्यवसायांचा खर्च वाढू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Blueberry Day: अँटीऑक्सिडंट्सचा राजा आहे 'हे' सुपरफूड! पाहा निरोगी आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या ब्लूबेरीचे 'असे' महत्वपूर्ण फायदे

अमेरिकेच्या ‘मिथोस’चा धसका

दुसरीकडे, अमेरिकेनेही अँथ्रोपिकच्या ‘मिथोस’ (Mythos) या प्रगत सायबरसुरक्षा एआय मॉडेलच्या वापरावर कडक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या याच ‘मिथोस’ सॉफ्टवेअरमधील त्रुटींचा गैरफायदा घेऊन वॉशिंग्टन चीनच्या हितांविरुद्ध सायबर हल्ले करू शकते, अशी भीती चिनी सायबर सुरक्षा तज्ज्ञांना सतावत आहे. यामुळेच चीन आता स्वतःचा ‘मिथोस’ विकसित करण्याच्या आणि आपल्या स्थानिक एआय इकोसिस्टमची छाननी करण्याच्या मागे लागला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra