Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अजब-गजब प्रेम! चुंबन घेत महिलेने ॲनाकोंडाला गळ्याभोवती गुंडाळले, दृश्यांनी नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

अजब-गजब प्रेम! चुंबन घेत महिलेने ॲनाकोंडाला गळ्याभोवती गुंडाळले, दृश्यांनी नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

  • अबब, महिलेने थेट अजगाराला गळ्याला गुंडाळलं
  • त्याला कुरवाळलं अन्…
  • पुढं जे केलं पाहून उडेल थरकाप
Woman Kissing Anaconda Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते.
कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडिओ असे असतात की अंगाचा थरकाप उडून जातो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहसा सापाचे नाव जरी एकले तरी भल्या भल्यांना घाम फुटतो. पण ही महिला मात्र भल्यामोठ्या अजगाकाला गळ्याभोवती गुंडाळून नदीच्या मधोमध निवांत बसली आहे. यानंतर पुढे तिने जे केलं आहे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

माणुसकीला काळीमा! १२०० रुपयांच्या उधारीसाठी महिलेची गरीब लेकीला मारहाण; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

नेमकं काय केलं महिलेने?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक महिला गढूळ पाण्याच्या नदीत आरामशीरपणे बसली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने तिच्या गळ्याभोवती ॲनाकोंडाला गुंडाळले आहे. एवढेच नाही तर ती त्याला प्रेमाने कुरवाळत आहे. महिलेच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती नसून ती त्याच्याशी खेळत आहे. आश्चर्य म्हणजे महिला प्रेमाने अजगराचे चुंबनही घेते.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव डॅनिएला असून ती एक वन्यजीव संवर्धक आहे. ॲमेझॉन रेस्क्यू अँड कन्झर्व्हेशन अलायन्सची ती सदस्य आहे. वन्यजीवांविषयी जनतेला जागृत करण्याचे काम डॅनिएला करते. तिने नुकतेच अनाकोंडा सोबच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ॲनाकोंडा हे विषारी नसतात, परंतु अत्यंत शक्तिशाली असतात. त्याच्या मोठ्या भक्ष्याची हाडेही चिरडून टाकायची ताकद असते. एका क्षणात ते भल्या मोठ्या भक्षाला गिळून टाकू शकतात.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डॅनिएलने आपल्या इन्स्टाग्रामवर @dani.villar_ अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाली आहे. अनेकांनी ताई सावध रहा, प्रेम महागात पडू शकते असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने एवढं धाडस येते तरी कुठून? असा प्रश्न केला आहे. तर तिसऱ्या एकाने सापाने तिला असाच विळखा घातला तर थेट स्वर्गातच जाईल ती असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'तुझी शाळाच फोडून टाकील' , शिक्षकाला भर वर्गात 'धमकी' ; चिमुकल्या विद्यार्थ्याचा तोरा पाहून नेटकरी म्हणाले…, Video Viral

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra