- रोहित शर्माने रहाणेसाठी केली भावुक पोस्ट
- अजिंक्य रहाणेने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती
- अनेक क्रिकेटपटूंनी दिल्या रहाणेला शुभेच्छा
काय म्हणाला रोहित शर्मा?
'आपण अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये सोबत घालवली आहेत. तू प्राप्त केलेल्या प्रत्येक यशात तू केलेली मेहनत, परिश्रम मी अत्यंत जवळून पाहिले आहेत. तुझे खेळाप्रतीचे समर्पण आणि व्यावसायिकता नेहमीच इतरांपेक्षा वेगळी आणि प्रेरणादायी राहिली आहे. या उत्कृष्ट आणि यशस्वी कारकिर्दीबद्दल तुझे मनापासून अभिनंदन! पुढील वाटचालीस आणि भविष्यातील सर्व आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!'
अजिंक्य रहाणे अत्यंत संयमी फलंदाज आणि खेळाडू म्हणउण ओळखला जायचं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने भारतीय संघाला अनेक विजय प्राप्त करून दिले. अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि सुवर्ण क्षण म्हणजे २०२०-२१ ची ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी. ॲडलेडमधील ३६ धावांच्या पराभवानंतर विराट कोहली भारतात परतला होता. अशा कठीण परिस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळत रहाणेने दुसऱ्या मेलबर्न कसोटीत ११२ धावांची ऐतिहासिक शतकी खेळी केली आणि भारतीय संघाला २-१ असा ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता.
Ajinkya Rahane च्या निवृत्तीनंतर KKR चा नवा राजा कोण? 'हे' खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत
अजिंक्य रहाणेने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये देखील वेगवान खेळपट्टीवर आपले शानदार योगदान दिले आहे. रहाणे केवळ एक उत्कृष्ट फलंदाज नव्हता, तर जगातील सर्वोत्तम स्लिप क्षेत्ररक्षकांपैकी एक होता. कसोटी सामन्यात एका डावात ८ झेल घेण्याचा जागतिक विक्रमही त्याच्या नावावर आहे.
Ajinkya Rahane Retirement: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटला केला अलविदा! IPL देखील खेळणार नाही, वाचा संपूर्ण करिअर
डोम्बिवलीतून लोकल ट्रेनने प्रवास करत मुंबईच्या आझाद मैदानावर सराव करण्यापासून ते भारतीय राष्ट्रीय संघाची कॅप क्रमांक २७८ परिधान करण्यापर्यंतचा अजिंक्य रहाणेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. त्याने कायम संघाला प्राधान्य दिले आहे. त्याने निवृत्ती घेतल्याने क्रिकेटविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

