Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Akola Crime News: 'मला इथून घेऊन जा' म्हणत रडली. काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

Akola Crime News: 'मला इथून घेऊन जा' म्हणत रडली. काही वेळातच विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

  • लग्नानंतर मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप.
  • घटनेपूर्वी पतीने “तिला घेऊन जा, नाहीतर काही बरेवाईट होईल” असा धमकीचा फोन केल्याचा दावा.
  • आईच्या तक्रारीवरून पती ताब्यात; सासू आणि सासऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल.
अकोला:अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच ‘तुमची आमच्यासमोर औकात नाही’ असे हिणवत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका तरुण विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणीचे नाव तनुजा असे आहे. तनुजा हीचा विवाह एप्रिल २०२४ मध्ये वाडेगाव येथील विशाल मानकर याच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगाही झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले. मात्र त्यानंतर पती, सासू आणि सासऱ्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही गरीब आहात, तुमची आमच्यासमोर औकात नाही. असे टोमणे मारणे सुरु झाले, तिच्यावर रोज मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले जात होते. तनुजाने या त्रासाबाबत अनेकदा आपल्या आईकडे आपबीती सांगितली होती.

डॉक्टरांनी केले मृत घोषित

३ ऑगस्ट रोजी रुपेरी तनुजाच्या नवऱ्याने तिच्या बहिणीला फोन केला होता. तनुजाला इथून घेऊन जा नाहीतर माझ्या हातून काही तरी बरेवाईट होईल. अशी उघड धमकी त्याने दिली होती. या फोननंतर घाबरलेल्या तनुजाने स्वतः नातेवाईकांना फोन करून मला तात्काळ इथून घेऊन जा, अशी विनंती करत रडण्यास सुरुवात केली. मात्र नातेवाईक काही पावले उचलणार तोच तनुजाने गळफास घेतल्याची बातमी समोर आली आहे. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या 'डीपफेक' व्हिडिओचा वापर करून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 1.7 कोटींना…

गुन्हा दाखल

तनुजाच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारींवरून पोलिसांनी पती विशाल मानकर, सासू सविता मानकर आणि सासरे दिलीप मानकर यांच्याविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर पतीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी पोलीस करत आहे. पोलीस या प्रकरणी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई तीव्र केली जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

माहेरी अंत्यसंस्कार

तनुजावर तिच्या माहेरी अश्रूधाल्या नयनोबांनी अंत्यसंस्कार केले.या घटनेमुळे माहेरच्या लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra