Dailyhunt
Akshaya Tritiya: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया, काय आहे अक्षय्य तृतीयेची महती जाणून घ्या

Akshaya Tritiya: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया, काय आहे अक्षय्य तृतीयेची महती जाणून घ्या

  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीया
  • काय आहे अक्षय्य तृतीयेची महती
  • अक्षय्य तृतीयेला काय केले जाते

अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस. हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.

अक्षय या शब्दांचा अर्थ आहे कधीही न संपणारे किंवा शाश्वत. या दिवशी केलेले पुण्य, दान आणि शुभ कार्य कधीही नष्ट होत नाही असं मानलं जातं. अक्षय्य तृतीयेची महती काय आहे, जाणून घ्या

परशुरामाचा जन्मदिवस म्हणून ओळख

या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी त्रेतायुगाशी सुरुवात झाली होती. परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी करणं शुभ मानलं जातं. नवीन व्यवसाय किंवा कामाची सुरुवात करणं, गरिबाला दानधर्म करणं, घरात पूजा, हवन आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व

अक्षय्य तृतीयेला या गोष्टींचा नैवेद्य दाखवतात

महाराष्ट्रात लोक या दिवशी अन्नदान किंवा जलदान करतात. शेतकरी पेरणीपूर्वी या दिवशी भूमिपूजन देखील करतात. या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड, आमरस पुरी इत्यादी विविध प्रकारचे गोड जेवण केले जाते. अक्षय्य तृतीया हा आपल्याला दान, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे संदेश देतो. या दिवशी केलेले चांगले कर्म आयुष्यभर फलदायी ठरतात, अशी श्रद्धा आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त

हिंदू धर्मात गुढीपाडवा, दसरा, दिवाळीमधील पाडवा आणि अक्षय्य तृतीया हे साडेतीन मुहूर्त मानले जातात. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे जसे की घराची खरेदी, व्यवसाय, लग्नाची तयारी किंवा नवीन गुंतवणूक करणे शुभ मानले जाते, अशी श्रद्धा आहे.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला पूजा करताना या फुलाचा करा वापर, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचा मिळेल आशीर्वाद

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra