Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Amazon Prime Day 2026 : Amazon वरून बुक करता येणार येझ्दी स्क्रॅम्बलर; प्राईम डे सेलमध्ये खास ऑफर्सचा लाभ

Amazon Prime Day 2026 : Amazon वरून बुक करता येणार येझ्दी स्क्रॅम्बलर; प्राईम डे सेलमध्ये खास ऑफर्सचा लाभ

Amazon Prime Day 2026 निमित्त मोटरसायकलप्रेमींसाठी खास संधी उपलब्ध झाली आहे. जावा येझ्दी मोटरसायकल्सने आपल्या लोकप्रिय येझ्दी स्क्रॅम्बलरला Amazon.in च्या ‘New Launch Store’ वर विक्रीसाठी आणण्याची घोषणा केली आहे.

4 ते 6 जुलै 2026 या कालावधीत होणाऱ्या प्राईम डे सेलमध्ये प्राईम सदस्यांना आकर्षक ऑफर्ससह ही मोटरसायकल बुक करता येणार आहे. येझ्दी स्क्रॅम्बलर ही शहरातील दैनंदिन वापर आणि वीकेंड रायडिंग या दोन्ही गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही भारतातील सर्वात हलकी स्क्रॅम्बलर मोटरसायकल असून, नव्या 350 सीसी लिक्विड-कूल्ड ‘कतार’ इंजिनामुळे ती दमदार परफॉर्मन्स, उत्कृष्ट हँडलिंग आणि विविध प्रकारच्या रस्त्यांवर सहज रायडिंगचा अनुभव देते. आकर्षक डिझाइन आणि आधुनिक फीचर्समुळे ही बाईक तरुण रायडर्ससाठी खास ठरते.

Petrol नंतर आता Diesel चा नंबर? 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची मोठी योजना, नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?

या उपक्रमाबाबत जावा येझ्दी मोटरसायकल्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले की, भारतात स्क्रॅम्बलर सेगमेंटला नवी ओळख देणारी येझ्दी स्क्रॅम्बलर आता Amazon च्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचेल. या भागीदारीमुळे साहसी रायडिंगचा अनुभव नव्या पिढीपर्यंत अधिक सहजपणे पोहोचवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राईम डे सेलमध्ये ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय, निवडक बँक कार्डांवर ₹3,000 पर्यंतची त्वरित सूट, Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डधारक प्राईम सदस्यांसाठी 5 टक्के कॅशबॅक आणि पात्र व्यावसायिक खरेदीवर GST इनव्हॉइसचे फायदे मिळणार आहेत. त्यामुळे मोटरसायकल खरेदी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

कॅफे अकासाचा 'मॉन्सून स्पेशल मील' लॉन्च; पावसाळ्यातील चवींचा खास आस्वाद आता विमानप्रवासातही

ग्राहक Amazon.in वरून बुकिंग रक्कम भरून मोटरसायकल आरक्षित करू शकतात. त्यानंतर अधिकृत डीलर उर्वरित ऑन-रोड पेमेंट, नोंदणी, विमा आणि डिलिव्हरीची प्रक्रिया पूर्ण करेल. तसेच अॅक्सेसरीज आणि इतर अॅड-ऑन्सही अधिकृत डीलरशिपमधून उपलब्ध असतील. ₹1,99,950 (एक्स-शोरूम, दिल्ली) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्या येझ्दी स्क्रॅम्बलरसोबत 4 वर्षे किंवा 50,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी, 6 वर्षांपर्यंत वाढीव वॉरंटी, 8 वर्षांपर्यंत रोडसाइड असिस्टन्स, 5 वर्षांपर्यंत एएमसी आणि देशभरातील 400 हून अधिक सेल्स व सर्व्हिस केंद्रांचे जाळे अशा विविध ओनरशिप सुविधाही कंपनीकडून दिल्या जाणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra