Dailyhunt
"बंद करा युद्ध", व्यक्तीने भल्यामोठ्या पुलावर चढून अमेरिका-इराण युद्धाचा केला निषेध; सोशल मिडियावर Video Viral

"बंद करा युद्ध", व्यक्तीने भल्यामोठ्या पुलावर चढून अमेरिका-इराण युद्धाचा केला निषेध; सोशल मिडियावर Video Viral

  • एका व्यक्तीने लक्ष वेधण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धत अवलंबली
  • सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये खळबळ उडाली
  • सोशल मीडियावर त्याच्या कृतीवर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसल्या
अनेक काळापासून अमेरिका-इराणचे युद्धफार चर्चेत आहे. या युद्धाचा फटका फक्त दोन्ही देशांनाच नाही तर इतर देशांवरही याचा चांगलाच परिणाम होतोना दिसून आला. यामुळे भारतात सिलेंडरची कमतरता भासू लागली आणि पेट्रोलचे भाव देखील उंचावले. अशातच आता या युद्धाचा निशेष करण्यासाठी एक व्यक्तीने अनोखा मार्ग निवडल्याचे दिसले. अमेरिका-इराण युद्धामुळे होणाऱ्या विनाशकारी विध्वंसाबद्दल संपूर्ण जग चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर व्यक्तीच्या एक व्हिडिओने मात्र लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने नक्की काय केलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

भररस्त्यात संतापजनक प्रकार! धावत्या दुचाकीवर महिलेला अमानुष मारहाण; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

अमेरिका-इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी व्यक्तीने धोकादायक मार्ग निवडला. त्याने भल्यामोठ्या पुलावर चढून स्टंटबाजी करत युद्ध थांबवण्याची विनंती केली. व्हिडिओ अमेरिकेतील वॉशिंग्टनमधून समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार , त्या व्यक्तीचे हे अनोखे आणि आश्चर्यकारक प्रदर्शन फ्रेडरिक डग्लस मेमोरियल ब्रिजवर पाहायला मिळाले. त्याने पुलावर चढून हातात एक मोठा काळा कपडा हवेत फडकवला. काळा रंग हा विशेषत: निषेधासाठी वापरला जातो. व्हिडिओत दूरुनच खाली उभे असलेले असंख्य लोक आश्चर्याने त्याच्या या कृतीकडे पाहताना दिसले. अनेकांनी ही दृष्ये आपल्या कॅमेरात टिपली तर काहींना सोशल मिडियावर व्यक्तीच्या या निषेधाला शेअर केले. सांगितले जात आहे की, व्यक्तीच्या या प्रतापामुळे पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी व्यक्तीला उतरवण्याचे काम हाती घेतले. सोशल मिडियावर मात्र व्यक्तीच्या धाडसाचे आता काैतुक करण्यात येत आहे.

माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं…, पाहा काय घडलं? Video Viral

हा व्हिडिओ @aljazeeraenglish नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'इराणवरील युद्धाचा निषेध करण्यासाठी, वॉशिंग्टनमधील 'फ्रेडरिक डग्लस मेमोरियल ब्रिज'च्या शिखरावर एक ४५ वर्षीय व्यक्ती ठाण मांडून बसली आहे. ग्विडो राईकस्टॅड्टर यांनी या वास्तूच्या शिखरावरून 'अल जझीरा'शी संवाद साधला. त्यांनी काय म्हटले आहे, ते ऐका.' व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, "अरे बापरे, हा रॉक क्लायंबरही आहे का?", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "या माणसाचे धाडस आपल्या संपूर्ण सरकारपेक्षाही जास्त आहे" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "खरा अमेरिकन देशभक्त आणि नायक".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra