Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Bank Jobs 2026: बँकिंग क्षेत्रात बंपर भरती! अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष जाणून घ्या एका क्लिकवर..

Bank Jobs 2026: बँकिंग क्षेत्रात बंपर भरती! अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष जाणून घ्या एका क्लिकवर..

Bank Jobs 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनकडून CRP CSA-XVI अंतर्गत क्लर्क भरती २०२६ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे देशभरातील ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण ११,४०३ क्लर्क पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.

कोणी करावा अर्ज?

IBPS ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीद्वारे सहभागी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील क्लर्क पदे भरली जातील. ही भरती दरवर्षी आयोजित केली जाते आणि यंदा ती CRP CSA-XVI या नावाने आयोजित केली जात आहे. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे अनिवार्य आहे. उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

किती असेल अर्ज शुल्क?

जनरल, ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS): ₹८५० शुल्क

एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD): ₹१७५ शुल्क

‘या’ ११ बँकांमध्ये होणार नियुक्ती

बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि यूको बँक यांचा समावेश आहे.

Delhi University: दिल्ली विद्यापीठात १ वर्षाच्या पीजी कोर्सेसच्या जागा वाढल्या! पण प्राध्यापक का आहेत चिंतेत?

कधी होणार परीक्षा?

पूर्व परीक्षा : १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल.

मुख्य परीक्षा: पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांसाठी २७ डिसेंबर २०२६ रोजी मुख्य परीक्षा घेतली जाईल.

स्थानिक भाषा चाचणी: दोन्ही टप्प्यांत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यात स्थानिक भाषेतील प्राविण्य चाचणी द्यावी लागेल.

Vinoba Digital App: ‘विनोबा’ अ‍ॅपने बदलला शासकीय शाळांचा चेहरा! विद्यार्थ्यांना कसा होतोय फायदा जाणून घ्या एका क्लिकवर..

असा करा ऑनलाईन अर्ज:

1. सर्व प्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाईट ibps.in वर जा.

2. होमपेजवर असलेल्या ‘CRP CSA-XVI’ च्या अर्ज लिंकवर क्लिक करा.

3. आता चालू असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.

4. नोंदणीनंतर मिळालेल्या आयडी-पासवर्डने लॉगिन करून अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.

5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क जमा करा.

6. सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra