Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'बेबी बॉस'च्या उपकर्णधारपदावरून वाद; 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का? टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर

'बेबी बॉस'च्या उपकर्णधारपदावरून वाद; 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का? टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर

  • ‘बेबी बॉस’च्या उपकर्णधारपदावरून वाद
  • Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का?
  • टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर
भारताचा स्फोटक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. बंगळुरुमध्ये येथे २३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा संघ जाहीर झाला.
यावेळी १५ वर्षीय वैभवची पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात वाद निर्माण झाला. क्रीडा तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंच्या एका गटाने या निर्णयावर टीका केली, त्यांच्या मते वैभव सूर्यवंशीला इतक्या लहान वयात उपकर्णधारपद करणे योग्य नव्हते. या टीकेवर आता निवड समितीच्या सदस्याने स्पष्टीकरण दिले आहे.

वो अलग ही लेव्हल का बंदा! 'बेबी' बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…

वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची कमान का?

अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्त केल्यानंतर अनेक स्तरावरुन टीका करण्यात आली. आता या टिकेवर पूर्व विभागाच्या निवड समिती सदस्यांपैकी एक आणि ओडिशाचा माजी रणजी खेळाडू प्रबंजन मलिक यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रबंजन मलिक म्हणाले की, ‘ त्याला कर्णधार म्हणून नव्हे, तर केवळ उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. संघाचा कर्णधार ईशान किशन आहे. ईशान एक यष्टीरक्षक आहे जो दिवसभर मैदानावर सक्रिय असतो आणि खेळाच्या रणनीतीमध्ये सहभागी असतो. वैभव दिवसभर संघाचे नेतृत्व करेल हे पूर्णपणे स्पष्ट नाही. वैभव जसजसा प्रगती करत आहे, तसतसा तो अधिक परिपक्व होत आहे. आम्हाला विश्वास आहे की त्याला अधिक जबाबदारी दिल्याने एक खेळाडू आणि लीडर म्हणून त्याची प्रगती होण्यास मदत होईल.’

मलिक पुढे म्हणाले की, निवड समितीला वैभवमध्ये भविष्यातील भारतीय कर्णधाराची क्षमता दिसते. ते म्हणाले, ‘कोणास ठाऊक? आम्हाला आशा आहे की तो एक दिवस भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार होऊ शकेल. वैभवला उपकर्णधार बनवण्यामागे हीच प्रेरणा होती.’

पूर्व विभागीय निवड समितीच्या मते, वैभवसाठी कर्णधारपद किंवा उपकर्णधारपद नवीन नाही. त्याने यापूर्वीही अशा भूमिका यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. मलिक यांनी आठवण करून दिली की, वैभव त्याच्या घरच्या संघ, बिहारसाठी प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये उपकर्णधार आहे. इतकेच नाही, तर २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याने भारतीय संघात उपकर्णधारपदाची भूमिका निभावली आहे.

निवडीपूर्वी कोणतीही चर्चा झाली नाही

निवड समितीने वैभवला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यापूर्वी त्याच्याशी चर्चा केली होती का, हे उघड करताना प्रभंजन मलिक म्हणाले की, ‘ नाही, त्याच्याशी आधी कोणतीही चर्चा झाली नव्हती. हा पूर्व विभागातील सर्व राज्यांच्या निवड समितीने घेतलेला सामूहिक निर्णय होता. आम्हाला खात्री आहे की वैभवमध्ये जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे आणि गरज पडेल तेव्हा संघाचे नेतृत्व करण्यास तो पूर्णपणे सक्षम आहे.’

वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून रंगला वाद; माजी कर्णधाराचा संताप, नेमकं प्रकरण काय?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra