Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Belated ITR Filing: डेडलाईन संपली, आयटीआर भरायचा राहून गेलाय? लगेच करा 'हे' काम; नाहीतर बसू शकतो मोठा दंड

Belated ITR Filing: डेडलाईन संपली, आयटीआर भरायचा राहून गेलाय? लगेच करा 'हे' काम; नाहीतर बसू शकतो मोठा दंड

  • आयटीआर भरायचा राहून गेलाय?
  • लगेच करा ‘हे’ काम
  • नाहीतर बसू शकतो मोठा दंड
Belated ITR Filing: ३१ जुलै, प्रत्येक टॅक्सपेअरसाठी महत्त्वाचा दिवस होता. कारण आयटीआर दाखल करण्याची ही अंतिम मुदत होती.
बहुतेक करदात्यांनी आपला आयटीआर वेळेवर दाखल केला आहेत पण काही कारणास्तव टॅक्स भरला नसेल किंवा शेवटच्या क्षणी टॅक्स दाखर करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला असेल. त्यामुळे त्यांना टॅक्स भरता आला ( Belated ITR Filing ) नसेल तर मग काय"text-align: justify;">Rate 1 August: LPG सिलेंडर झाला स्वस्त! 1 ऑगस्टला पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्येही दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

ज्या करदात्यांनी अद्याप आपला रिटर्न दाखल केलेला नाही, त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल: अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर आता ते आपला आयटीआर दाखल करू शकतात का? जर तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर दाखल केला नसेल, तर काही पर्याय आहेत ज्याचा वापर करु शकता. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या दंडाला सामोरं जावं लागणार नाहीत. नेमके काय आहेत हे पर्याय ?

31 जुलैनंतर आयटीआर कसा दाखल करावा?

ज्यांनी अंतिम मुदतीपर्यंत आपला आयटीआर दाखल केलेला नाही, ते अंतिम मुदतीनंतरही आपला रिटर्न दाखल करू शकतात. परंतु रिटर्न दाखल करण्यापूर्वी त्यांनी काही अटी माहित असणं गरजेचं आहे. त्याची जाणीव ठेवून पुढे ही प्रक्रिया करावी. आयकर कायद्याच्या कलम १३९(४) अंतर्गत विलंबित रिटर्न दाखल केले जाऊ शकतात. मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी विलंबित रिटर्न ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत दाखल केले जाऊ शकतात. पण, जर तुमचे मूल्यांकन त्यापूर्वी पूर्ण झाले असेल, तर त्यानंतर रिटर्न दाखल करता येणार नाही.

बिलेटेड रिटर्न भरण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या

विलंबित रिटर्न भरण्यापूर्वी, फॉर्म 16, फॉर्म 26AS, TIS, AIS आणि बँक व्याज यांसारखी काही महत्त्वाची माहिती भरणे आवश्यक आहे. जर तुमची कोणतीही थकबाकी असेल, तर ती आधी भरा, त्यानंतर तुमचा विलंबित रिटर्न भरा आणि ई-व्हेरिफाय करा.

विलंबित आयटीआर भरल्यास लागेल लेट फी

आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत, विलंबित आयटीआर भरल्यास विलंब शुल्क आकारले जाते.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर ₹5,000 पर्यंत विलंब शुल्क लागू होऊ शकते.
जर तुमचे वार्षिक उत्पन्न ₹5 लाखांपर्यंत असेल, तर ₹1,000 पर्यंत विलंब शुल्क लागू होऊ शकते.
याव्यतिरिक्त, जर करदात्याची थकबाकी असेल, तर त्यांना कलम 234A, 234B आणि 234C अंतर्गत केवळ विलंब शुल्कच नव्हे, तर व्याज देखील भरावे लागेल.

या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून पुढची सगळी प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यानुसार तुम्हाला लेट फी लागु शकते हे जाणून घेणे गरजेचे आहे.

PM KISAN Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! पीएम किसान योजनेची मुदत वाढवली; वर्षाला मिळणार आता इतके रुपये

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra