Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Besan-Paneer Chilla: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला; रेसिपी नोट करा

Besan-Paneer Chilla: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला; रेसिपी नोट करा

काळच्या नाश्त्यामध्ये टेस्ट आणि हेल्थ या दोन्हीही गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून चवदार आणि पौष्टिक पदार्थांची निवड करणे आवश्यक असते. जर तुम्ही रोजच्या नाश्त्याला पोहे, उपमा किंवा पराठा खाऊन कंटाळला असाल तर बेसन-पनीर स्टफ्ड चिल्ला नाश्त्यासाठी ठरेल एकदम बेस्ट पर्याय.

बेसनातील प्रथिने आणि पनीरमधील कॅल्शियम व प्रोटीन यामुळे हा पदार्थ पोटभर तर होतोच, शिवाय शरीरालाही आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. झटपट होणाऱ्या या बेसन-पनीर स्टफ्ड चिल्याची रेसिपी नक्की ट्राय करा.

Motion Sickness: प्रवासात मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? 'हे' घरगुती उपाय नक्की करा ट्राय

साहित्य

  • १ कप बेसन
  • १ कप किसलेले पनीर
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ बारीक चिरलेला टोमॅटो
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ½ चमचा हळद
  • ½ चमचा लाल तिखट
  • ½ चमचा ओवा किंवा जिरे
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तेल किंवा तूप

चिल्ल्याचे पीठ असे तयार करा"text-align: justify;" class="bullet-text">एका भांड्यात बेसन, हळद, तिखट, ओवा, मीठ आणि पाणी घालून गुठळ्या राहणार नाहीत असे मध्यम घट्ट पीठ तयार करा. हे मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे चिल्ला अधिक मऊ तयार होतो. एका भांड्यात किसलेले पनीर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र मिसळा. आवडीनुसार चिमूटभर काळी मिरी किंवा चाट मसाला घालून मिश्रण अधिक चवदार बनवू शकता. गरम तव्यावर थोडे तेल लावून बेसनाचे पीठ गोल आकारात पसरवा. एक बाजू शिजल्यानंतर त्यावर पनीरचे स्टफिंग पसरवा. चिल्ला अर्धा दुमडून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. गरमागरम चिल्ला हिरवी चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

टीप

  • चिल्ल्याचे पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवू नका. मध्यम आचेवर भाजल्यास चिल्ला बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ तयार होतो. ताजा पनीर वापरल्यास चव आणखी छान लागते.
  • आवडीनुसार गाजर, ढोबळी मिरची किंवा कोबीसारख्या भाज्याही यात घालू शकता.
महागडी क्रीम नको! तांदळाच्या पाण्यापासून घरच्या घरी बनवा नाईट क्रीम; चेहरा दिसेल तजेलदार

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra