Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Bhandara: 'पशुसंवर्धन'तर्फे पशुधन रक्षणासाठी लसीकरण मोहीम; पशुपालकांना मिळणार मोठा दिलासा

Bhandara: 'पशुसंवर्धन'तर्फे पशुधन रक्षणासाठी लसीकरण मोहीम; पशुपालकांना मिळणार मोठा दिलासा

  • लाळखुरकुत (FMD) रोगाच्या बचावासाठी ऑगस्टपासून जिल्ह्यात जंतनिर्मूलनासह ९ वी लसीकरण मोहीम सुरू होत आहे.
  • एनडीएलएम (NDLM) पोर्टलवर लसीकरणाची नोंद करणाऱ्या खाजगी तंत्रज्ञांना प्रति जनावर ₹५ दिले जातील.
  • आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी सर्व जनावरांचे १००% लसीकरण करून घ्यावे.

पशुधनाचे लाळखुरकुत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून प्रभावी संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम फेरी ९ चे आयोजन करण्यात आले. ही लसीकरण मोहीम आगामी ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या लसींचे शीत साखळीची पूर्ण खबरदारी घेऊन योग्य प्रकारे वाटप करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. तसेच लस वाटपाचा सविस्तर तालुकावार अहवाल मुख्य कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

परिणामकारक लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व पशुधनाचे जंतनिर्मूलन करण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या औषधींचा पुरवठा जिल्ह्यातील सर्व संबंधित संस्थांना आधीच करण्यात आला आहे. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत पशुधनाला एफएमडी लसीकरण करून त्याची नोंद एनडीएलएम पोर्टलवर घेतल्यास प्रती पशुधन ५ रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.

झाडांना जास्त प्रमाणात फळे-फुले लागणं असू शकते दुष्काळाची चाहूल! जाणून घ्या 'स्ट्रेस फ्रूटिंग'ची रंजक गोष्ट

मोहिमेत सक्रिय सहभागाचे आवाहन

पशुधन विविध रोगांपासून सुरक्षित ठेवणे आणि पशुपालकांचे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळणे या उद्देशासाठी ही नववी लसीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करून घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन विलास गाडगे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra