Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भररस्त्यात संतापजनक प्रकार! धावत्या दुचाकीवर महिलेला अमानुष मारहाण; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

भररस्त्यात संतापजनक प्रकार! धावत्या दुचाकीवर महिलेला अमानुष मारहाण; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

  • धावत्या दुचाकीवर महिलेला मारहाण
  • व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट
  • पाहा नेमकं काय घडलं?
Man Beats Woman on Bike Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात.
कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ थेट मनाला भिडणारे असतात. तर काही संतापजनक घटनांचे दृश्य पाहायला मिळते. गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचाराचे, छळाचे, त्यांचे हत्येच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा परिस्थिती महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेला धावत्या दुचाकीवर मारहाण करण्यात आली आहे. या व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

माणुसकी अजून जिवंत आहे! धावत्या ट्रेनसमोर आडवी आली म्हैस; शेवटच्या क्षणी लोको पायलटनं जे केलं…, पाहा काय घडलं? Video Viral

भररस्त्यात धावत्या दुचाकीवर महिलेला मारहाण

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दुचाकी चालवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकी चालवत असताना त्याने मागे बसलेल्या महिलेचे केस ओढून धरले आहे. दोघांमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरुन वाद सुरु आहे हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु व्यक्ती महिलेला वारंवार मारहारण करत आहे. तिचे केस ओढत, तिला बुक्क्या घातल आहे. महिला मात्र शांतपणे बसलेली आहे. तिच्यावरील अत्याचाराविरोधात कोणाही प्रत्युत्तेर तिने दिलेले नाही. रस्त्यावर प्रचंड रहदारी सुरु आहे. येथून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरणे केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काहींनी व्हिडिओ काढणाऱ्यावर टीका केली आहे. एका नेटकऱ्याचे म्हणणे आहे की, त्याने व्हिडिओ काढण्यापेक्षा बाईक थांबवून हे रोखायला हवे होते, तर काहींनी संबंधित महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांनी हा प्रकार थांबवायला हवा होता असे लोकांचे म्हणणे आहे. तर काहींनी महिला शांत का बसली आहे असा प्रश्न केला आहे.

रिलचा नाद बेतला जीवावर! उंच टाकीवर चढले अन् शिडीच तुटली; पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra