Sunday, 24 Jan, 7.41 pm नवराष्ट्र

होम
भरतपूर | 'ती' मागील पाच महिन्यांपासून आहे कोरोनाग्रस्त, ३१वी कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह

प्रतिकात्मक फोटो

एक महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित असून तिची 31 वेळा टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. देशातली अशाप्रकारची पहिली केस असून डॉक्टरांसाठी या महिलेवर नेमके निदान करणे आव्हान समजले जातेय. शारदा देवी असे त्या महिलेचे नाव आहे. कमीतकमी चौदा दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होतो. पण राजस्थानच्या भरतपुरच्या एक महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित आहे.

भरतपूर (Bharatpur). एक महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित असून तिची 31 वेळा टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. देशातली अशाप्रकारची पहिली केस असून डॉक्टरांसाठी या महिलेवर नेमके निदान करणे आव्हान समजले जातेय. शारदा देवी असे त्या महिलेचे नाव आहे. कमीतकमी चौदा दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होतो. पण राजस्थानच्या भरतपुरच्या एक महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित आहे.

30 वर्षाच्या शारदा देवी यांच्या 31 टेस्ट झाल्या आहेत. यामध्ये 17आरटी पीसीआर आणि 14 रॅपिड एंटीजन टेस्ट केल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर अॅलोपेथी, होमियोपेथी आणि आयुर्वेदीक उपचारपद्धती केली आहे, मात्र त्यांच्यावर काहीही परिणाम होताना दिसत नाहीय. डॉक्टर या केसबाबत हैराण आहेत. कारण कोरोना रिपोर्ट वारंवार पॉझिटिव्ह येऊनही शारदा देवी यांची तब्येत उत्तम आहे. या दरम्यान त्यांचे वजनही 8 किलो वाढले आहे. डॉक्टरांसाठी शारदा देवी यांची केस आश्चर्यच आहे. अशाप्रकारची देशातली ही पहिली केस असेल असे डॉक्टरांचे म्हणने आहे.

अपना घर आश्रमात शारदा देवी यांच्यासह चार जण पॉझिटिव्ह आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर शारदा यांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरानी त्यांची मानसिक आणि शारीरीक स्थिती योग्य नसल्याचे सांगत परत पाठवले. त्यांच्यासोबत कोणीतरी असायला हवे. त्यानंतर आश्रमने त्यांचे कोविड सेंटर खोलले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शारदा देवी कोरोना पॉझिटिव्ह असूनही त्या इतरांसाठी धोकादायक नाहीत. कारण त्यांच्या शरीरात असलेला कोरोना विषाणू अॅक्टिव्ह नाही. त्यांच्यामुळे दुसऱ्या कुणालाही संक्रमण होण्याचा धोका नाही. पण त्यांना काळजी म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रुग्णाच्या नाकातील त्वचेत डेड वायरस आहे. त्यामुळे नाकाची त्वचा कमजोर होते व रुग्णाचे टेस्ट पॉझिटिव्ह येतात. दुसरी गोष्ट म्हणजे शारदा देवी यांची रोग प्रतिकारशक्ती फारच कमी आहे. त्यामुळे संसर्ग पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. पण याबाबत नेमके कारण शोधता येत नसल्याने डॉक्टरांना उपचार करणं कठिण होतंय.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top