Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव. चुकूनही जाण्याची हिंमत करू नका

भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव. चुकूनही जाण्याची हिंमत करू नका

  • ठिकाणाची ओळख शांततेसोबतच गूढ आणि भितीदायक वातावरणासाठीही आहे
  • रात्रीच्या वेळी इथे जाण्याबाबत अनेक विचित्र दावे केले जातात
  • स्थानिक कथांमुळे या ठिकाणाभोवती रहस्य आणि भीतीचे सावट निर्माण झाले आहे
प्रवासाचा विषय आला की, समुद्रकिनारासर्वांच्याच मनात येतो. निळाशार समुद्र, शांत वातावरण आणि हवेची ती लहर मनाला प्रसन्न करुन जाते. हेच कारण आहे की शहराच्या गडबटापासून दूर लोक समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्याची अधिकतर निवड करतात. पण तुम्हाला माहिती आहे का"color: #0000ff;">Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

भूतांचे वास्तव

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला डुमास बीच, गुजरातमधील सर्वात भितीदायक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. या समुद्रकिनाऱ्यावर काळ्या रंगाची वाळू पाहायला मिळते. डुमास बीचचा एकेकाळी स्मशानभूमी म्हणून वापर केला जात होता आणि म्हणूनच, हे ठिकाण अशा अनेक भुतांचे वास्तव असल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की, भूतांनी हा परिसर कधीही सोडला नाही आणि ते इथेच राहतात.

समुद्रकिनाऱ्यावर लोक झालेत गायब

स्थानिकांचा दावा आहे की, इथली काळी वाळू ही अंत्यसंस्कार केलेल्या अवशेषांची राख आहे. वाळूत मिसळल्यामुळे त्याला काळा रंग मिळाला. तथापि या दाव्याबाबत कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. हे खरे आहे की इथे गेल्यावर लोकांना नक्कीच एक विचित्र अनुभव मिळतो. आजूबाजूचा परिसर सुंदर असला तरी तो निराशाजनक वाटतो. असे म्हटले जाते की, इथे भरपूर नकारात्मकता भरलेली आहे. चंद्र उगवल्यानंतर, तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर एकही माणूस दिसणार नाही. गुजरातच्या या डुमास बीचवर अनेक पर्यटक अचानक गायब झाल्याचे वृत्त आहे. एकदा इथे व्यक्तीचा मृतदेह देखील आढळून आला होता.

भारतात या गावात पाण्यावर तरंगणारा रस्ता, शहरापासून दूर इथे मिळेल पर्यटनाचा अद्भुत अनुभव

विचित्र आवाज ऐकायला येतात

अनेकांना इथे विचित्र आणि भितीदायक आवाज ऐकल्याचा दावा देखील केला आहे. रात्रीच्या प्रहरी इथे लोकांना कुणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू येतो. इतकेच नाही तर स्थानिकांच्या मते, समुद्रकिनाऱ्यावर भूतांचा वावर आहे, यामुळे रात्रीच्या वेळी इथे कुणीही जाण्याची हिम्मत करत नाही. डुमास बीचवर पोहचणे फार सोपे आहे. अनेक मार्गांनी इथे पोहचता येते. सुरत शहरापासून अंदाजे २० किमी अंतरावर असलेल्या या बीचवर पोहोचायला फक्त अर्धा तास लागतो. शहरातून डुमास बीचपर्यंत जाण्यासाठी अनेक सार्वजनिक वाहतूक सेवा देखील उपलब्ध आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra