Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय जहालमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचे निधन; जाणून घ्या २० मे चा इतिहास

भारतीय जहालमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचे निधन; जाणून घ्या २० मे चा इतिहास

ज २० मे, आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे जहालमतवादी लाला-बाल-पाल या त्रयीमधील नेते बिपिन चंद्र पाल यांची आज पुण्यतिथी आहे.

त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात १९०५ ते १९२० मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. त्यांनी बंदे मातरम् आणि न्यू इंडिया या नियतकालिकांचे संपादन केले आहे.

20 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1498 : पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत (कलकत्ता) भारतीय बंदरावर आला.
  • 1540 : छायाचित्रकार अब्राहम ऑर्टेलियस यांनी पहिले आधुनिक ॲटलस थिएटरम ऑर्बिस टेरारम प्रकाशित केले.
  • 1873 : लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याच्या बटणांसह निळ्या जीन्सचे पेटंट घेतले.
  • 1891 : थॉमस एडिसनने किनेटोस्कोपचा पहिला नमुना प्रदर्शित केला
  • 1902 : क्युबाला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1927 : सौदी अरेबियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1948 : चियांग काई शेक यांची चीन प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
  • 1990 : हबल स्पेस टेलिस्कोपने अंतराळातून पहिली छायाचित्रे पाठवली.
  • 1996 : देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द'इयर हा पुरस्कार जाहीर.
  • 2000 : राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.
  • 2001 : चित्रपट निर्माते आणि लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2011 : झारखंडच्या गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल यांनी माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला होण्याचा मान मिळवून गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नवा इतिहास रचला.
मराठी पत्रकारितेचे आद्य जनक 'दर्पणकार' बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १८ मे चा इतिहास

20 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1818 : 'विल्यम फार्गो' - अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1881)
  • 1850 : 'विष्णूशास्त्री चिपळूणकर' - केसरी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 17 मार्च 1882)
  • 1851 : 'एमिल बर्लिनर' - ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1929)
  • 1860 : 'एडवर्ड बकनर' - आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1917)
  • 1884 : 'पांडुरंग दामोदर गुणे' - प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 1922)
  • 1900 : 'सुमित्रानंदन पंत' - छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी यांचा जन्म. (मृत्यू: 28 डिसेंबर 1977)
  • 1913 : 'विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट' - हेव्हलेट-पॅकार्ड चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 2001)
  • 1915 : 'मोशे दायान' - इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑक्टोबर 1981)
  • 1944 : 'डीट्रिख मत्थेकित्झ' - रेड बुल चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1952 : 'रॉजर मिला' - कॅमेरुनचा फूटबॉलपटू यांचा जन्म.

20 मे रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1506 : 'ख्रिस्तोफर कोलंबस' - इटालियन दर्यावर्दी व संशोधक यांचे निधन.
  • 1571 : 'केशवचैतन्य' ऊर्फ बाबाचैतन्य - राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.
  • 1766 : 'मल्हारराव होळकर' - इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1693)
  • 1878 : 'कृष्णशास्त्री चिपळूणकर' - समाजसुधारक व संस्कृत विद्वान यांचे निधन.
  • 1932 : 'बिपिन चंद्र पाल' - स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1858)
  • 1961 : 'भाई विष्णूपंत चितळे' - कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते यांचे निधन.
  • 1992 : 'डॉ. लीला मूळगांवकर' - सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1916)
  • 1994 : 'के. ब्रम्हानंद रेड्डी' - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 28 जुलै 1909)
  • 1997 : 'विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर' - इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील यांचे निधन.
  • 2012 : 'लीला दुबे' - भारतीय मानववंशशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1923)
  • 2012 : 'यूजीन पॉली' - रिमोट कंट्रोल चे शोधक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1915)
बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा वाढदिवस; जाणून घ्या १९ मे चा इतिहास
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra