Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीसीच्या पैशांच्या वादातून व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बीसीच्या पैशांच्या वादातून व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : बीसीच्या पैशांच्या देण्या-घेण्याच्या वादातून एका 55 वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉड व मोटारसायकलच्या चैनने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथे घडली आहे.

या प्रकरणी आंबी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव कृष्णा शिवणकर (वय 55, रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा) यांचा बीसीच्या पैशांच्या व्यवहारावरून आरोपींशी वाद झाला होता. त्यातून विक्रम बाबुराव गरड व दिपक विक्रम गरड (दोघे रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा) यांनी 28 मे 2026 रोजी दुपारी 3 ते 4.30 वाजण्याच्या सुमारास चिंचपूर खुर्द तसेच चिंचपूर ते रत्नापूर मार्गावर महादेव शिवणकर यांना लोखंडी रॉड आणि मोटारसायकलच्या चैनने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महादेव शिवणकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अशोक गुरुदास शिवणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 30 मे 2026 रोजी आंबी पोलिस ठाण्यात आरोपी विक्रम गरड व दिपक गरड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेमुळे चिंचपूर खुर्द परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास आंबी पोलिसांकडून सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra